अभिजीत दिपके भडकले पोलिसावर, थेट म्हटले, तु्म्ही कोण मला सांगणारे की मी..
अभिजीत दिपके यांचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीत दिपके एका पोलिस अधिकाऱ्यावर संतापताना दिसत आहेत. हेच नाही तर त्यांनी या पोलिस अधिकाऱ्याला घराबाहेर काढले आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. अभिजीत दिपके अमेरिकेतून भारतात दाखल झाले आणि नीट पेपरफुटीविरोधात मोठे आंदोलन उभे केले. विशेष म्हणजे त्यांच्या या आंदोलनाला इतका जास्त प्रतिसाद मिळाला की, थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. दिल्लीतील आंदोलनानंतर अभिजीत दिपके छत्रपती संभाजीनगर येथील घरी दाखल झाले. दोन दिवस सीजेपीच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे झाली. या बैठकीला महत्वाचे नेते उपस्थित होते. पक्षाचे पुढील ध्येय धोरणे यादरम्यान ठरवण्यात आली. आता अभिजीत दिपके यांचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीत दिपके एका पोलिसाला आपल्या घरातून बाहेर जाण्यास सांगताना दिसत आहेत.
अभिजीत दिपके पोलिस अधिकाऱ्यावर संतापले आहेत. अभिजीत दिपके पोलिस अधिकाऱ्यांवर संतापले आहेत. भेटीसाठी येणाऱ्यांना पोलिसांकडून उद्धट वागणूक दिली जात असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी पोलिस अधिकाऱ्याला बोलताना अभिजीत दिपके यांनी म्हटले की, मी सीपी साहेबांना बोलतो… तुम्हाला काय त्रास आहे. आजपर्यंत कोणताच प्रॉब्लेम झाला नाही, कोणत्या पोलिसांना.. आम्ही तुम्हाला आज बघतोय.
कोणत्या विभागाचे आहेत तुम्ही. पोलिस स्टेशन कोणते आहे… पद कोणते आहे तुमच्याकडे? नाव काय आहे? नाव लिहून घ्या यांचे… तुम्ही कोण सांगणार मी कोणाला भेटायचे कोणाला नाही? मी ठरवणार आहे ते..लोकं मला भेटायला येत आहेत आणि मी ज्यांना आत घेत आहे.. तुम्ही कोण आहेत ठरवणारे. तुम्हाला मी पहिल्यांदा इथे बघत आहे. तुम्ही बाहेर जा सर प्लीज… असे म्हणत अभिजीत दिपके हे त्या पोलिस अधिकाऱ्याला घराबाहेर काढताना दिसत आहेत.
अभिजीत दिपके भडकले पोलिसांवर, थेट काढले पोलिस अधिकाऱ्याला घराबाहेर, व्हिडीओ पुढे.. pic.twitter.com/WaJy5JU215
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 7, 2026
यावेळी ते पोलिस अधिकारी घराबाहेर जाताना दिसत आहेत. ज्या पोलिस अधिकाऱ्याला अभिजीत दिपके यांनी बाहेर काढले ते पोलिस अधिकारी सिनिअर दिसत आहेत. असे असे चालणार नाही, जे लोक मला भेटायला येत आहेत, त्यांना असे बोलले मला अजिबात चालणार नाही. यावेळी अभिजीत दिपके चांगलेच संतापलेले दिसत आहेत. अभिजीत दिपके यांचे असे वागणे लोकांना अजिबात आवडत नाही. हा भाऊ पब्लिक सिटीसाठी पोलिसांनाही सोडत नसल्याचे अनेकांनी म्हटले. यासोबतच ज्या पोलिस अधिकाऱ्यावर अभिजीत दिपके भडकताना दिसत आहेत, ते सिनिअर पोलिस अधिकारी दिसत आहेत. अभिजीत दिपकेचे अति होत असल्याचेही अनेकांनी म्हटले.