AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke : गुजरातहून आलेला एक तरुण अभिजीत दीपकेंच्या घरासमोर आंदोलनाला बसला, कारण.. VIDEO

Abhijeet Dipke : जवळपास सात तास चाललेल्या या बैठकीत बरच विचारमंथन करण्यात आलं. या बैठकीत काय ठरलं? त्याचा रोडमॅप अभिजीत दीपके यांच्याकडून आज जाहीर केला जाऊ शकतो.

Abhijeet Dipke : गुजरातहून आलेला एक तरुण अभिजीत दीपकेंच्या घरासमोर आंदोलनाला बसला, कारण.. VIDEO
protest outside Abhijeet dipke home
| Updated on: Aug 06, 2026 | 2:50 PM
Share

नुकतीच कॉकरोच जनता पार्टीची बैठक पार पडली. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके याच्या निवासस्थानी ही बैठक झाली. दिल्लीत जंतर-मंतरवरील आंदोलन यशस्वी झाल्यामुळे सध्या कॉकरोच जनता पार्टीच्या प्रत्येक घडामोडीकडे माध्यमांचं, लोकांचं बारीक लक्ष आहे. सीजेपीची भविष्यातील वाटचाल ठरवण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्वाची होती. दरम्यान CJP च्या मिटींगला न बोलावल्याने गुजरातच्या एका तरुणाने अभिजीत दिपकेच्या घरासमोर आंदोलन केलं. “देशपातळीवर टीम तयार करा आठ लोकांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही. अभिजीत दिपकेच्या निवासस्थानासमोर बसून आंदोलन केलं. परिवार आणि मित्र जर मीटिंगमध्ये बसत असतील तर हे चालणार नाही. CJP च्या मीटिंगमध्ये निवडक लोकांना का सामील केलं जातं?. हे कौटुंबिक आंदोलन नाही, हे देशव्यापी आंदोलन आहे” असं या तरुणाचं म्हणणं होतं.

जवळपास सात तास चाललेल्या या बैठकीत बरच विचारमंथन करण्यात आलं. या बैठकीत काय ठरलं? त्याचा रोडमॅप अभिजीत दीपके यांच्याकडून आज जाहीर केला जाऊ शकतो. सीजेपीचा येणाऱ्या दिवसात अजून विस्तार होणार आहे. जेन-झी तरुण या पक्षाचे मुख्य समर्थक आहेत. अभिजीत दीपके यांना पत्रकारांनी सीजेपीला राजकीय पक्षामध्ये बदलणार का? असं सुद्धा विचारलं. त्यावर त्यांनी इतक्यात तरी नाही असं उत्तर दिलं. इतके राजकीय पक्ष असताना आणखी एका राजकीय पक्षाची गरज काय? असं त्यांचं म्हणणं होतं. सध्या तरी कॉकरोच जनता पार्टी दबावगट म्हणून काम करणार अशी रणनिती आहे.

सीजेपी कुठल्या मुद्यांना प्राधान्य देणार?

कॉकरोच जनता पार्टीकडून शिक्षण, बेरोजगारी या मुद्यांना प्राधान्य दिलं जाऊ शकतं. नीट पेपर फुटीविरोधातील त्यांचं पहिलचं आंदोलन यशस्वी ठरलं. त्यामुळे शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्न ते उपस्थित करु शकतात. परीक्षा प्रणालीतील पारदर्शकता, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना, विद्यार्थ्यांचे हित, जबाबदारी निश्चित करणे आणि शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करणे, या मुद्द्यांवर CJP कडून सातत्याने आवाज उठवला जाऊ शकतो. कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रंका यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यांनी त्यातून वाटचालीसंदर्भात माहिती दिली आहे.

Follow Us
नार्को टेस्टलाही तयार!; जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचं सडेतोड उत्तर
Chandrashekhar Bawankule on Manoj Jarange | नार्को टेस्टलाही तयार!; जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचं सडेतोड उत्तर
जरांगे पाटलांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
जरांगे पाटलांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले कोर्टात...
आंदोलन पेटलं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल; जरांगेंचा फडणवीसांना इशारा
Manoj Jarange | आंदोलन पेटलं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल; मनोज जरांगेंचा फडणवीसांना थेट इशारा
उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल
Manoj Jarange | उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! थेट एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष, नेमकं काय घडलं?
डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग...शिंदेंवर जरांगेंची तोफ धडाडली
Manoj Jarange on Eknath Shinde | डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग... एकनाथ शिंदेंवर मनोज जरांगेंची तोफच धडाडली
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर आरोप
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर गंभीर आरोप
कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेसचा हल्ला
Vijay Wadettiwar | कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेस नेत्यांचा जोरदार हल्ला
अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं
Delhi | अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं; पुन्हा कामकाज स्थगित
अरे, तुम्ही मला पाणीच... धनंजय मुंडेंचा तो व्हिडीओ व्हायरल
अरे, तुम्ही मला पाणीच... सुनेत्रा पवारांच्या उपस्थित पत्रकारांना अडवण्यापूर्वीचा मुंडेंचा व्हिडीओ तुफान व्हायरल