VIDEO : भाजपा नगरसेवकाचा डान्सबारमधील व्हिडीओ व्हायरल

ठाणे : ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी ओळख असलेल्या भाजपच्या ठाण्यातील नगरसेवकाचे मद्यधुंद अवस्थेतील ‘चाळे’ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ठाणे महापालिकेतील भाजपचे नगरसेवक विलास कांबळे यांचा डान्सबारमधील मद्यधुंद अवस्थेतील डान्स करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऐन निवडणुकीदरम्यान हा प्रकार समोर आल्याने युतीच्या उमेदवारासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तर, नगरसेवक …

VIDEO : भाजपा नगरसेवकाचा डान्सबारमधील व्हिडीओ व्हायरल

ठाणे : ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी ओळख असलेल्या भाजपच्या ठाण्यातील नगरसेवकाचे मद्यधुंद अवस्थेतील ‘चाळे’ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ठाणे महापालिकेतील भाजपचे नगरसेवक विलास कांबळे यांचा डान्सबारमधील मद्यधुंद अवस्थेतील डान्स करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऐन निवडणुकीदरम्यान हा प्रकार समोर आल्याने युतीच्या उमेदवारासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तर, नगरसेवक कांबळे यांच्यावर कारवाई करण्याऐवजी भाजपचे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी मात्र कांबळेंच्या कृत्याचे समर्थन केलं आहे. “कांबळे यांची ही लाईफस्टाईल असून याला भयानक कृत्य म्हणता येणार नाही” असं संदीप लेले म्हणाले. यामुळे कांबळेंच्या या व्हिडीओचे पडसाद भाजप वरिष्ठांपर्यंत उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीसाठी ठाण्यात लोकसभा मतदारसंघातून शिवसेना नेते राजन विचारे विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांच्यात लढत रंगणार आहे. या दोन्ही पक्षांकडून प्रचारसभांना सुरुवात केली आहे. मात्र, नुकतंच बसपामधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवक विलास कांबळे यांनी युतीच्या उमेदवाराचा प्रचार सोडून ‘पार्टी विथ डिफरन्स चाळे’ सुरु केले आहेत. सध्या विलास कांबळे यांचा मद्यधुंद अवस्थेत डान्सबारमध्ये डान्स करण्यात व्यस्त असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

या आधीही विलास कांबळे हे आपल्या कृत्यामुळे चर्चेत आले होते. त्यांच्या गाडीवरील बनावट नंबरप्लेटमुळे त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. बारमध्ये तोडफोड करण्याचा प्रकार देखील त्यांनी केला होता. यापूर्वी शिवसेनेच्या कोठयातून स्थायी समिती सभापती बनलेल्या कांबळे यांची पत्नीदेखील भाजपची नगरसेविका आहे. मात्र,ऐन लोकसभा निवडणुकीत हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने युतीच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

व्हिडीओ : 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *