Vivekanand Patil: एक पेड माँ के नाम अन् सारं जंगल बाप के नाम; मोदींच्या घोषणेचा दाखला देत विवेकानंद पाटीलची सरकारवर टीका, म्हणाले…
Vivekanand Patil On Sahyadri Project: महाराष्ट्राला गुजरातच्या दावणीला बांधण्याचं षडयंत्र सुरू आहे. प्रकल्पांतील रोजगार आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावरून विवेकानंद पाटीलने आरोप केला आहे.

विवेकानंद पाटीलने आज संवाद साधला आहे. बोलताना विवेकानंद पाटील म्हणाला की, गेल्या 10 दिवस बघत आहे. वृक्षतोडमध्ये मी नेहमी सांगत होतो. पुण्यात आंदोलन सुरू होतं. ते संपल्यावर मी लगेच याठिकाणी पाहणी केली. विकासच्या नावाखाली हजारो झाडतोड असेल तर आम्ही विरोध करणार. मी जंगलात गेलो होतो. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड झाली आहे. महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवायची असेल तर महाराष्ट्रामध्ये विकास झाला पाहिजे. त्यासाठी विविध कंपनी या ठिकाणी आल्या पाहिजे, असं तो म्हणाला आहे.
विवेकानंद पाटीलने सांगितलं की, प्रत्येक वेळा विकासाच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल होत असेल या विरोधात आम्ही शंभर टक्के उतरणार. शाळेच्या पुस्तकात शिकवलं जातं की झाडे तोडू नका. सरकार भिंतीवरील लिहित असतात झाडे लावा. पंतप्रधानांनी एक पेड माँ के नाम म्हणायचं आणि सारं जंगल बाप के नाम करायचं. गुजराती लोकांना कुठल्याही प्रकारच्या प्रकल्पाला आम्ही थारा देणार नाही. राज्यकर्त्यांनी महाराष्ट्र-गुजरातच्या धावणीला बांधण्याचं षडयंत्र रचलं आहे, असं त्याने सांगितलं.
तो म्हणाला की, एक पण मराठी माणूस नाही. 24 प्रकल्प आहेत त्याला फक्त गुजराती लोक आहेत. गंगा नदीच्या पूजा करायला तिथे देखील आम्हाला वाटलं पर्यावरण बद्दल प्रचंड प्रेम आहे. पर्यावरण हानी झाडे तोडून होत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणतात की 34 हजार झाडे तोडली जातील. 90 हजार झाड लावली जातील. 2016 मध्ये 33 हजार कोटी प्रकल्पासाठी झाडं आम्हाला मोजून दाखवा. झाडे कुठे लावले आहेत.
विवेकानंद पाटील म्हणाला की, मुख्यमंत्री म्हणतात की येणाऱ्या पिढ्यांना आम्ही दुष्काळ बघू देणार नाही. आज इकडे डोळ्यांनी दुष्काळ पडतोय त्याचे उत्तर कोण देणार. पर्यावरण मंत्री राज्याचे मंत्र्यांची प्रतिक्रिया पाहिली तर ते पर्यावरणच्या खात्यामधील नाही. प्रकल्पाबद्दल जे काही प्रवक्ते आहेत त्यांना माझ्यासमोर उभे करा. मी पर्यावरणाचे फक्त चार कायदे विचारेल. एक तरी सांगता आलं तर परत मी व्यासपीठावर दिसणार नाही. आज भीमाशंकरमध्ये शेकरू सापडत आहे. पक्ष स्थापन करण्यासाठी आणि सत्ता स्थापन करण्यासाठी आमदार कमी पडत असेल तर ते तुम्ही ते फोडून दुसऱ्या पक्षात आणू शकतात.
गोकुळ दुधाला चार नामनिर्देश सदस्य दिले. तसं करता येईल म्हणून का तुला शेकरू नाव दिले. मराठी माणूस मरत आहे. त्यात देखील आमची झाड तोडत आहेत. हे फक्त गुजरातीसाठी का? जे समर्थन करत प्रवक्ते आहेत फिरायला लागलेले त्यांना सांगतो की झाड तोडली. तर उद्या तुमच्या पिंड्याला कावळा देखील मिळणार नाही. वीज प्रकल्पालात मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार. पण सांगता येत नाही. पर्यावरणeमध्येच एक अधिकारी आहेत ते त्यांचे हस्तक आहेत, असं म्हणत विवेकानंद पाटीलने टीका केली आहे.
विवेकानंद पाटील पुढे म्हणाला की, सरकार विकासाच्या नावाखाली फक्त झाड तोडत आहेत. झाड खायचा भसम्या रोग झाला आहे. मला देखील लोक विचारत आहेत तुमचा कुठला पक्ष. मी कुठल्या राजकीय पक्षात जातो यावर खूप जणांचे लक्ष आहे. या प्रकल्पाला शेवटपर्यंत विरोध झाला पाहिजे. गांधीगिरी सरकारला खपत नाही म्हणून मी माझं ब्रह्मास्त्र बाहेर काढतो शब्दांचं. मराठी माणसांकडून ही चालवलेली चळवळ आहे. या प्रकल्पाला एकही वीट सह्याद्रीमध्ये उभी राहू देणार नाही. आत्महत्या कोणीही करू नका. लढण्याच्या मागे कोणी उभा राहिला नाही तरी मराठी माणूस राहतो, असं तो म्हणाला.