मे महिन्यातच धबधबे वाहू लागले, लिंगमळा, ओझर्डे धबधबा फेसाळला, मिनी काश्मीरमध्ये पर्यटकांची गर्दी

राज्यात मान्सूनपूर्व जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. डोंगर दऱ्यांमध्ये असणारे धबधबे प्रवाहित झाले आहे. मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वरमधील लिंगमळा धबधबा ओसांडून वाहू लागला. त्यामुळे पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.

| Updated on: May 26, 2025 | 9:31 AM
1 / 5
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये पडलेल्या पावसामुळे धबधबे प्रवाहित झाले आहेत. महाबळेश्वरमधील  लिंगमळा धबधबा मे महिन्यातच फेसाळला आहे. या धबधब्याला पाहण्यासाठी महाबळेश्वरमध्ये पर्यटक गर्दी करू लागले आहेत.

2 / 5
महाराष्ट्राचा मिनी काश्मीर म्हणून महाबळेश्वरची ओळख आहे. महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस पडला आहे. रविवारी रात्री 25 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तसेच सोमवारीही महाबळेश्वर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे येथील वेण्णा नदीवरील लिंगमळा धबधबा ओसांडून वाहू लागला आहे.

3 / 5
महाबळेश्वर परिसरातील शेतीसह नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. मे महिन्यातच महाबळेश्वरमधील सौंदर्य पावसाळ्यासारखे झाले आहे. सध्या शाळांना सुट्या आहेत. त्यामुळे पर्यटनासाठी महाबळेश्वरमध्ये गर्दी झाली आहे. पावसाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे सर्वत्र हिरवळ दिसू लागली आहे.

4 / 5
सातारा जिल्ह्यात कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे या भागातील पर्यटनाचे आकर्षण असलेला ओझर्डे धबधबा वाहू लागला आहे. आजपर्यंतच्या इतिहासात मे महिन्यात पहिल्यांदाच हा धबधबा प्रवाहित झाला आहे.

5 / 5
सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात गेल्या आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे ओढे नदी नाले भरून वाहू लागले आहेत. धरणाच्या पाणी पातळीत ही वाढ झाली आहे. तसेच आसपासच्या परिसरात छोटे मोठे धबधबे कोसळू लागले आहेत.  डोंगर रांगातील छोटे-मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत.