AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निधी आम्ही आणला, उद्घाटन त्यांनी केलं… शाळेच्या निधीपासून अधिकाऱ्यांच्या बैठकांपर्यंत; शिंदेसेनेच्या आमदाराने तटकरेंवर आरोपांची मालिकाच लावली

Raigad Politics News: रायगडमध्ये महायुतीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले आहे. महेंद्र दळवींनी सुनील तटकरेंवर निशाणा साधल्याने नव्या वादाची ठिणगी पडली आहे.

निधी आम्ही आणला, उद्घाटन त्यांनी केलं... शाळेच्या निधीपासून अधिकाऱ्यांच्या बैठकांपर्यंत; शिंदेसेनेच्या आमदाराने तटकरेंवर आरोपांची मालिकाच लावली
| Updated on: Oct 04, 2026 | 5:24 PM
Share

रायगडमधील राजकारण हे कुणापासून लपलेलं नाही. रायगड जिल्ह्यात महायुतीमधील अंतर्गत वाद हा वारंवार दिसून येत आहे. अशातच आता रायगड जिल्ह्यात महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर कामाच्या श्रेयावरून आमदार महेंद्र दळवी आणि खासदार सुनील तटकरे यांच्यातील संघर्ष पुन्हा पाहायला मिळत आहे. रोहा तालुक्यातील खैराळे खुर्द उर्दू शाळेच्या निधी आणि उद्घाटनावरून दळवींनी तटकरेंवर निशाणा साधला आहे. श्रेयवादावरून आमदार महेंद्र दळवी आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली आहे. यामुळे आता राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

रोहा तालुक्यातील खैराळे खुर्द उर्दू या शाळेसाठी आपण निधी आणला, मात्र खासदार सुनील तटकरे यांनी शाळेचं उद्घाटन केलं, असा दावा महेंद्र दळवींनी केला आहे. प्रोटोकॉलनुसार आम्हा सर्वाना कार्यक्रमाला बोलावणं गरजेचं होतं, मात्र नेहमीप्रमाणे सुनील तटकरेंनी आपल्याला बोलावलं नाही, असा आरोप महेंद्र दळवींनी केला आहे. सुनील तटकरेंना दुसऱ्यांदा सबुरीचा सल्ला देतो, असा टोलाही दळवींनी लगावला आहे.

रोह्यातील कार्यक्रमात प्रोटोकॉलनुसार पालकमंत्र्यांचं नाव नसल्याचं सांगत कुटुंबातील प्रतिनिधी आम्हीच करायचा आणि ते लोकांना दाखवायचं, असा आरोपही महेंद्र दळवींनी केला आहे. लोक आता शहाणे आणि ज्ञानी आहेत. ज्यांनी काम केलं, ज्यांनी निधी आणला, त्यांनीच काम करायला पाहिजे, असं म्हणत दळवींनी तटकरेंवर टीका केली आहे. जिल्ह्यातील सर्व इंडस्ट्रीचा निधी रोह्यातच का आणि एकाच कामावरच का, असा सवालही दळवींनी उपस्थित केला आहे. या सर्व मुद्द्यांवर पालकमंत्री डीपीसीच्या बैठकीत प्रतिक्रिया देतील, असंही ते म्हणाले.

याशिवाय नेहमीच्या सवयीप्रमाणे खासदार अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी बैठकांचं आयोजनही केलं जातं, असा आरोप महेंद्र दळवींनी केला आहे. यानंतर जिल्ह्यातील राजकारण आता ढवळून निघालं आहे. आता या आरोपांवर तटकरे कुटुंबाकडून काय प्रत्युत्तर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच सुनील तटकरे या आरोपांना कधी आणि काय उत्तर देणार, अशा चर्चा आता जिल्ह्यात रंगल्या आहेत.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात