Weather Forecast : कोकण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो ॲलर्ट जारी

| Updated on: Sep 21, 2021 | 11:28 AM

पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

Weather Forecast : कोकण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो ॲलर्ट जारी
बेळगावमध्ये मुसळधार पावसामुळे घर कोसळून पाच जण ठार
Follow us on

मुंबई: भारतीय हवामान विभागानं (IMD) महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर, मुंबईत ढगाळ वातावरण राहील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. तर, हवामान विभागानं काही जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट जारी केला आहे.

कोकण, उत्तर महाराष्ट्र ते विदर्भ यलो अ‌ॅलर्ट

कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

21 सप्टेंबर- पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड औ,रंगाबाद, जालना, बीड, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, , गोंदिया (यलो अलर्ट)

22 सप्टेंबर- 22 सप्टेंबर- पालघर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली (यलो अलर्ट)

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस

प्रादेशिक हवामान विभाग केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार 21 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वीजेच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर, 21 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि बीडमध्येही तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ही माहिती, डॉ. के.के . डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याकडून मिळाली आहे.

महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कायम

महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कायम असल्याचं स्कायमेटचे महेश पुलावत यांनी सांगितलं आहे. त्यामुळे 23 सप्टेंबरपर्यंत मान्सूनचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. याशिवाय विदर्भातही पावसाचा जोर वाढला असून धरणांतील पाणी साठ्यात वाढ झाली असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

इतर बातम्या:

आमच्या पक्षातील ‘या’ नेत्याला मंत्रिमंडळातून काढा, काँग्रेस नेत्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

पश्चिम बंगालचा गड सर करण्यासाठी काँग्रेसचा मराठमोळा शिलेदार, डॉ. अमोल देशमुख प्रभारीपदी

Weather Forecast IMD issue rain heavy rain fall alert in Maharashtra mostly rain in Palghar, Thane, and districts of Vidarbha