महाराष्ट्रात वारं फिरलं, 27, 28 आणि 29 ला धो धो पाऊस, 85 किमीच्या वेगाने येतंय वादळ, आज राज्यात..
Weather Update : हवामानात बदल होताना दिसत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात पुढील काही दिवस धो धो पाऊस असणार आहे. आज राज्यातील जवळपास जिल्ह्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

मुंबईसह उपनगरांमध्ये मोठा उकाडा वाढला आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. अरबी समुद्रात मोठे चक्रीवादळ येतंय. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. ज्यामुळे चक्रीवादळ निर्माण झाले.
उत्तरेकडे वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे. पाच राज्यांवर याचा परिणाम दिसून येईल. कोकण आणि मुंबईत वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यातील काही जिल्ह्यात पाऊस होण्याचा अंदाज आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि कोकण किनारपट्टीच्या काही भागात पाऊस होण्याचा अंदाज आहे. 150 किमी ताशी वेगाने वारे यादरम्यान वाहण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात आज उष्णता वाढण्याची शक्यता आहे.
27 तारखेला उद्या राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस होण्याचा अंदाज आहे. धो धो पाऊस होईल. वारे फिरल्याचे बघायला मिळतंय. विदर्भात 27 आणि 28 तारखेला वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होईल.
या चक्रीवादळाचा राज्याला थेट धोका नसला तरीही अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल, तसा अंदाज आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आज वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे.