AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli Anushka Sharma: ज्यांचे भजन ऐकून विराट, अनुष्का मंत्रमुग्ध होतात; ते कृष्णादास आहे तरी कोण?

Virat Kohli And Anushka Sharma Krushnadas Concert Video: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा कृष्णादास यांच्या कॉन्सर्टमधील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

Virat Kohli Anushka Sharma: ज्यांचे भजन ऐकून विराट, अनुष्का मंत्रमुग्ध होतात; ते कृष्णादास आहे तरी कोण?
| Updated on: Oct 26, 2026 | 7:25 AM
Share

Virat Kohli And Anushka Sharma Video Viral : विराट कोहली कायमचाच लंडनमध्ये स्थायिक झाला आहे हे काय नवीन नाही. पण असे असले तरीही तो अधून मधून भारतात येत असतो, कधी कधी मॅच खेळायला तर कधी कधी त्याच्या पर्सनल कामासाठी भारतात येत असतो. आता नुकताच तो भारतात परतला आहे. काल तो एका कार्यक्रमात दिसला ज्याचे व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत मुंबईत कृष्णा दास यांच्या कॉन्सर्टमध्ये दिसले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये हे जोडपे प्रेक्षकांमध्ये बसून कार्यक्रमाचा आनंद घेताना दिसत आहे. विराट काळ्या रंगाच्या टी-शर्ट आणि कॅज्युअल कपड्यात दिसला, तर अनुष्का गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. चाहत्यांना त्यांची साधी शैली खूप आवडली आहे. गेल्या काही वर्षांपासून हे जोडपे आध्यात्मिक कार्यात अधिकाधिक सहभागी होत आहे.

३१ मे १९४७ रोजी अमेरिकेत जन्मलेल्या कृष्णा दास यांचे खरे नाव जेफ्री केगल आहे. १९६० आणि १९७० च्या दशकात भारताला भेट दिल्यानंतर ते जेफ्रीपासून कृष्णा दास झाले. भारतात ते नीम करोली बाबांना भेटले. भारतीय अध्यात्माची अधिक सखोल समज प्राप्त झाली. असे मानले जाते की, भारतात नीम करोली बाबांना भेटल्यामुळे जेफ्री यांना अध्यात्म आणि भारतीय संस्कृतीबद्दल एक नवीन दृष्टीकोन मिळाला.

जेफ्री यांनी नीम करोली बाबांना आपले गुरू म्हणून स्वीकारले. जेफ्री यांच्या म्हणण्यानुसार, नीम करोली बाबा प्रसन्न झाले आणि त्यांनी मला कृष्णदास हे नाव दिले. भारतातून परतल्यानंतर, जेफ्री यांनी आध्यात्मिक आणि धार्मिक संगीतावर आधारित भजने गायला सुरुवात केली. कृष्णावर असलेल्या गाढ श्रद्धेमुळे जेफ्री यांनी स्वतःला कृष्णदास असे नाव दिले.

दुसरीकडे, विराट कोहली ४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेसाठी पूर्णपणे तयार आहे. कोहली नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामुळे आता न्यूझीलंडविरुद्ध तो आक्रमकपणा दाखवेल यात काही शंका नाही.

Follow Us
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत