
महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातून अशी एक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहाकारांना प्रचंड धक्का बसला आहे. बोरामणीच्या गवताळ प्रदेशात तब्बल 15 वर्तुळ असलेला एक विशालकाय चक्रव्यूह आढळून आलं आहे. या चक्रव्यूहाचं वैशिष्ट म्हणजे हे चक्रव्यूह भारतामधील आतापर्यंत सापडलेलं सर्वात मोठं दगडी चक्रव्यूह आहे. तसेच या चक्रव्यूहामुळे प्राचीन रोम साम्राज्य आणि भारतामधील व्यापारी संबंध नेमके कसे होते, यावर देखील प्रकाश पडला असून, प्राचीन काळात भारत आणि रोममधील व्यापाराचा हा सर्वात मोठा पुरावा असल्याचं मानलं जातं आहे. विशेष म्हणजे या प्रदेशात पुरातत्व शास्त्र विभागाने कोणतंही खोदकाम सुरू केलं नव्हतं, तर दुर्मिळ प्रजातीच्या प्राण्यांवर संशोधन सुरू असताना या चक्रव्यूहाचा शोध लागला आहे.
स्वयंसेवी संस्था असलेल्या नेचर कन्झर्वेशन सर्कल कडून बोरामणी वनक्षेत्रामध्ये लांडग्यांची संख्या किती आहे? यावर संशोध सुरू हेते. त्याचदरम्यान हे चक्रव्यूह आढळून आलं आहे. या टीमचे सदस्य असलेल्या पप्पू जमादार, नितीन अनवेकर, धनंजय काकडे, भरत छेडा, आदित्य झिंगाडे आणि सचिन सावंत यांनी यांची माहिती पुरातत्त्वशास्त्रज्ञ सचिन पाटील यांना दिली, त्यानंतर हे चक्रव्यूह आता जगासमोर आली आहे.
त्यानंतर डेक्कन कॉलेजच्या अभ्यासकांनी या चक्रव्यूहाचा बारकाईने अभ्यास केला, त्यांच्या रिपोर्टनुसार भारतामध्ये साधारणपणे कमी घेर असलेले असे चक्रव्यूह आढळून येतात, परंतु हे चक्रव्यूह तब्बल 15 घेर असलेलं आहे. इतिहासकारांच्या मते या संरचनेची निर्मिती ही दोन हजार वर्षापूर्वीची असावी. हे चक्रव्यूह अनेक दगडांच्या तुकड्यांनी बनलेलं आहे. या चक्रव्यूहासाठी जे दगड वापरण्यात आले आहेत, ते सर्व दगडं हे 1 ते 1.5 इंच उंचीचे आहेत, चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी निश्चित असा मार्ग देखील बनवण्यात आला आहे. पूर्वीच्या काळी रोमच्या नाण्यांवर हुबेहूब अशीच संरचना आढळून यायची. मात्र भारतात एवढं विशालकाय चक्रव्यूह सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या चक्रव्यूहाचा आणखी आभ्यास सुरू आहे. हा चक्रव्यूह भारतातील प्राचीन इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने एखाद्या दुर्मिळ खजना हाती लागावा एवढी महत्त्वाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया इतिहासकारांनी यावर दिली आहे.