उद्धव ठाकरे त्यावेळी ‘मूक’मोर्चाला काय म्हणाले होते? सुधीर मुनगंटीवार यांची नेमकी टीका काय?

| Updated on: Sep 02, 2023 | 6:13 PM

जालना येथे घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. अशी घटना व्हायला नको होती. स्वतः मुख्यमंत्री त्या आंदोलकांशी बोलले होते. देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत चर्चा न करता कायदे पास केले होते असे सांगितले.

उद्धव ठाकरे त्यावेळी मूकमोर्चाला काय म्हणाले होते? सुधीर मुनगंटीवार यांची नेमकी टीका काय?
SUDHIR MUNGANTIWAR AND SANJAY RAUT
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

हिंगोली : 2 सप्टेंबर 2023 | उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचा मूकमोर्चा निघाला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवले. तर, त्यांच्या पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये काय लिहिले होते याची आठवण करून देत राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अनुषंगाने वन मंत्री सुधीर मुनगंटीवार हिंगोली जिल्हा दौऱ्यावरती होते. त्यावेळी ते बोलत होते.

हिंगोली येथील आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूंचे दर्शन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतले. त्यानंतर त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अनुषंगाने हिंगोली येथील भाजपा कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवार यांनी मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेला लाठीमार हा निंदनीय असल्याचे सांगितले.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर नवीन सरकार राज्यात आले. त्यांनी न्यायालयात योग्य बाजू मांडली नाही. योग्य बाजू मांडण्यास ते कमी पडले. त्यामुळेच आज ही वेळ आली आहे. पण, सरकार पूर्णपणे मराठा आंदोलकांसोबत आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

चार वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा…

जालना येथील घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालन्या मराठा आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. पण, तेच चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांचे मराठा समाजावर प्रेम नव्हतं? आता इथे गेले नाही तर राजकारण कसं? येथे तर जावंच लागेल. काही लोक तर रात्री अडीच वाजता पोहोचले असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते ?

जालना येथील झालेल्या लाठीचार संदर्भात उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्य सरकारवर टीका केली. पण, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाजाचा मूकमोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी काय शब्द प्रयोग केला हे तुम्हाला माहित आहे असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

संजय राऊत यांच्यावरही टीका

राज्यात अशा घटना घडत असताना ते ज्या वेगात जातात तेव्हा त्यांनी जे मूक मोर्चा होता तेव्हा काय शब्द प्रयोग केला ते तुम्हाला माहित आहे. ते आता राजकारण करतील. त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची. संजय राऊत तुमच्या सामनामध्ये अप्रत्यक्षपणे तुम्ही मराठा समाजाच्या आंदोलनाला काय म्हणता..? ते माहित आहे. ते विसरला का? असा सवालही मुनगंटीवार यांनी केला.