AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कार्तिक एकादशीच्या महापूजेचा मान कोणाला? शिंदे की अजितदादा, शेवटी ठरलं

यंदा कार्तिक एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा कोणाच्या हस्ते होणार अजित पवार की एकनाथ शिंदे? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती, या संदर्भात आता मोठी बातमी समोर येत आहे.

कार्तिक एकादशीच्या महापूजेचा मान कोणाला? शिंदे की अजितदादा, शेवटी ठरलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 06, 2025 | 4:28 PM
Share

दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात येते. आषाढी एकादशीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा होते. यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा करण्यात आली. मात्र कार्तिक एकादशीला विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान हा उपमुख्यमंत्र्यांचा असतो. दरवर्षी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा होते.

परंतु सध्या राज्याला दोन उपमुख्यमंत्री आहेत, अजित पवार आणि एकनाथ शिंदे, त्यामुळे यंदा विठ्ठल रुक्मिणी यांच्या महापूजेचा मान कोणाला मिळणार? एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा होणार की अजित पवार यांच्या हस्ते? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आता ही उत्सुकता संपलेली आहे. यंदा हा मान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे.

कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठालाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करणार आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने याबाबत विधी व न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागितलं होतं. त्यानुसार आता शासकीय महापूजेचा मान हा एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे. विधी व न्याय विभागानं केलेल्या मार्गदर्शनानुसार यंदा कार्तिकी एकादशी निमित्त एकनाथ शिंदे हे विठ्ठलाची महापूजा करणार असल्याची माहिती  मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.

वर्षातून दोनदा होते शासकीय महापूजा  

दरवर्षी पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दोनदा शासकीय महापूजा होते. आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी निमित्त शासकीय महापूजा करण्यात येते. त्यापैकी आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करतात. तर कार्तिक एकादशीला हा मान उपमुख्यमंत्र्यांना असतो. यंदा आषाढी एकादशी निमित्त देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाची महापूजा केली, मात्र राज्याला दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे यंदा कार्तिक एकादशीच्या पुजेचा मान कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर याता एकनाथ शिंदे यांना हा मान मिळाला आहे, ते या कार्तिक एकादशीला विठ्ठलाची शासकीय महापुजा करणार आहेत.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान