शिवसेना कोणाची? न्यायालयातून बाहेर पडताच राऊतांचं व्हिक्ट्री साईन, राहुल शेवाळे म्हणाले…

आज शिवसेनेचं चिन्ह आणि नाव यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली, यावेळी कपिल सिब्बल यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला, यावर आता राहुल शेवाळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

शिवसेना कोणाची? न्यायालयातून बाहेर पडताच राऊतांचं व्हिक्ट्री साईन, राहुल शेवाळे म्हणाले...
Rahul Shewale
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 05, 2026 | 6:03 PM

आज न्यायालयात शिवसेनेचं चिन्ह आणि नाव यावर सुनावणी पार पडली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली. कपिल सिब्बल यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला आहे. या प्रकरणावर आता उद्या पुन्हा एकदा दुपारी दोन वाजता सुनावणी पार पडणार आहे. कपिल सिब्बल यांच्या या युक्तिवादावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले शेवाळे? 

विधानसभेचे जे सदस्य आहेत, ते देखील एकप्रकारे पक्षाचे सदस्यच असतात. त्यामुळे राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगळा होऊ शकत नाही, उद्या पुन्हा यावर युक्तिवाद होणार आहे. उद्या दुपारी पुन्हा दोन वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे. उद्या देखील कपिल सिब्बल हेच युक्तिवाद करणार आहेत, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आणखी एक वकील युक्तिवाद करणार आहेत. त्यानंतर आमच्या वतीने मेहता आणि कौल हे युक्तिवाद करतील, त्यानंतर याच्या संदर्भातील निर्णय होईल. कपिल सिब्बल यांनी आज जो काही युक्तिवाद केला, त्या युक्तिवादाला आमचे वकील प्रत्युत्तर देतील. कारण त्यांनी खोटी बाजू न्यायालयासमोर मांडली आहे, त्यांनी न्यायालयात जे काही आज मुद्दे मांडले आहेत, दरम्यान उद्या आमचे वकील न्यायालयात या प्रकरणाची खरी बाजू मांडतील, असं यावेळी शेवाळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कोर्टातून बाहेर पडताना संजय राऊत यांनी व्हिक्ट्री साईन दाखवलं यावर देखील यावेळी राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दावा कोणीही करेल, परंतु निर्णय देण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा आहे. त्यामुळे खरं तर असा दावा करता येत नाही, कारण तो सर्वोच्च न्यायालयाचा अपमान होईल. त्यामुळे असा दावा करता येत नाही. परंतु आम्हाला विश्वास आहे, आम्ही जी काही प्रक्रिया केली आहे, ती सर्व प्रक्रिया ही घटनेला अनुसरून केली आहे. त्यामुळे आम्हाला संपूर्ण विश्वास आहे, विश्वास असणं महत्त्वाचं आहे. दावा कोणालाही करता येत नाही, असं यावेळी राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us