पुण्यात का वाढताय GBS मृत्यू, जीबीएसचा राज्यातील इतर भागातही प्रसार

Pune GBS Disease : पुण्यानंतर राज्यातील इतर भागातही रुग्ण वाढत आहे. नागपुरातही जीबीएसचे रुग्ण वाढत आहेत. रुग्णसंख्या आठवर पोहोचली आहे. पुण्यातील सध्याच्या उद्रेकाचे प्रमुख कारण मोठ्या लोकसंख्येसाठी दूषित पाण्याचे स्त्रोत असू शकते.

पुण्यात का वाढताय GBS मृत्यू, जीबीएसचा राज्यातील इतर भागातही प्रसार
GBS Disease
| Updated on: Feb 01, 2025 | 8:06 AM

Guillain-Barre Syndrome: पुणे जिल्ह्यातील जीबीएसने चिंता वाढवली आहे. पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) झालेल्या तिसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील चौथ्या रुग्णाचा मृत्यू आहे. पुण्यानंतर आता राज्यातील इतरही जिल्ह्यात जीबीएसचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पुण्यातील नांदेड परिसरातील 60 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला आहे.

पुण्यातील नांदेड परिसरात अनेक रुग्ण हे जीबीएस बाधित आहेत. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. पुण्यात जीबीएस बाधित हा तिसरा रुग्ण आहे. त्यांना रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे काही दिवस पुण्यातील खासगी रुग्ण्यालयात उचार सुरु होते. त्यांची प्रकृती अधिक बिघडल्यानंतर कुटुंबाने त्या महिलेला ससून रुग्णालयात दाखल केले होत. ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

पुण्यात का वाढले प्रकरणे?

पुण्यात जीबीएसची प्रकरणे का वाढली त्यासंदर्भात कन्सल्टंट-न्यूरोलॉजी डॉक्टर निखिल जाधव यांनी बिझनेस स्टँडर्डला सांगितले की, भारतात GBS प्रकरणे फक्त शरद ऋतूमध्येच दिसतात. या काळात रुग्णांची संख्या वाढते. कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी संसर्गामुळे जीबीएसचा प्रादुर्भाव पहिल्यांदा चीनमध्ये दिसून आला. पुण्यातील सध्याच्या उद्रेकाचे प्रमुख कारण मोठ्या लोकसंख्येसाठी दूषित पाण्याचे स्त्रोत असू शकते. डॉक्टरांकडून त्वरित उपचार घेतल्यास हे रुग्ण बरे होतात. लक्षणे दिसू लागल्यानंतर 5 ते 7 दिवसांत उपचार सुरू करणारे रुग्ण नंतर निरोगी होतात. सध्याच्या उद्रेकाचे आणखी एक कारण म्यूटेंट वेरियंट असू शकतो.

नागपुरात रुग्ण वाढले

पुण्यानंतर राज्यातील इतर भागातही रुग्ण वाढत आहे. नागपुरातही जीबीएसचे रुग्ण वाढत आहेत. रुग्णसंख्या आठवर पोहोचली आहे. शहरातील एका खासगी रुग्णालयात जीबीएसच्या आणखी एका रुग्णांची नोंद झाली आहे. जीबीएसच्या ५६ वर्षीय रुग्णाने केअर रुग्णालयात उपचार घेतले होते. बरे वाटल्यानंतर त्याला सुट्टी दिली गेली. नागपूर जिल्ह्यात सध्या पाच जीबीएस रुग्ण दाखल आहेत. २०२४ मध्ये नागपूरात ५६ रुग्ण आणि तीन मृत्यू झाला.

सांगलीत सहा रुग्ण, नाशिकमध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क

जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेचा वैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे. महापालिकेच्या दोन रुग्णालयात विशेष कक्षांची स्थापना करण्यात आली. सांगलीत गुइलेन बॅरी सिंड्रोम रुग्णांची संख्या सहावर गेली आहे. सांगली शहरात एक तर ग्रामीण भागात पाच असे सहा गुइलेन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये आष्टा (ता.वाळवा), विटा (खानापूर) व नेलकरंजी (आटपाडी) येथील रूग्ण आहेत. या रूग्णांवर सांगली शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.