AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरांगेंना तुम्ही भेटायला का गेले नाहीत? खासदार ओमराजेंना तरुणाचा सवाल, संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल

जरांगे यांच्या उपोषणाला १६ दिवस पूर्ण झाले असून त्यांच्या उपोषणा संदर्भात जरांगे समर्थक आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

जरांगेंना तुम्ही भेटायला का गेले नाहीत? खासदार ओमराजेंना तरुणाचा सवाल, संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल
Manoj Jarange Patil - MP Omraje Nimbalkar
| Updated on: Sep 13, 2026 | 10:49 PM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून अंतरवालीत उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला १६ दिवस पूर्ण झाले आहेत. जरांगे यांनी मुंबईला जाण्याचा इशाराही दिला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी जरांगे यांना सणासुदीत मुंबईत आंदोलन करण्यास परवानगी दिलेली नाही. यात आता जरांगे यांच्या उपोषणस्थळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भेट का दिली नाही असा जाब एका मराठा तरुणाने त्यांना विचारल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. या कथित ऑडिओ क्लीपच्या सत्यते संदर्भात टीव्ही नाईन चॅनलने दुजोरा देत नाही. मात्र, या ऑडिओ क्लीपमुळे खासदार ओमराजे निंबाळकर चर्चेत आले आहेत. काय आहे की क्लीपमध्ये वाचूयात…

खासदार ओमराजे निंबाळकर यांना सवाल करणारी एका तरुणाची ( जरांगे समर्थक) ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यात हा तरुण ओमराजे यांना म्हणतो की “१४ दिवस झाले, तुम्ही जरांगे पाटील यांना भेटायला का गेले नाही? या जरांगे यांच्या समर्थक तरुणाच्या सवालावर ओमराजेंनी त्या तरुणाला उत्तर दिले आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीत उपोषण सुरू आहे या उपोषणाला आज 16 दिवस पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकर आणि एका जरांगे समर्थक तरुणामधील फोन संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये, “१४ दिवसांपासून उपोषण सुरू आहे, मात्र जरांगे पाटील यांना तुम्ही भेटायला गेले नाहीत,” असा सवाल संबंधित तरुण खासदार ओमराजे निंबाळकर यांना करताना ऐकायला येत आहे. त्यावरुन ओमराजे यांनी आपण अकरा वेळा जाऊन भेटून आलोय, तेव्हा दिसलं नाही का?” अशा शब्दांत या तरुणाला उत्तर दिल्याचे क्लिपमध्ये ऐकायला येत आहे. त्यावर या तरुणाकडून पुन्हा त्यांना सवाल केला जातो की, “मात्र तुम्ही सुरु असलेल्या या उपोषणाच्या टप्प्यात जरांगे पाटील यांना भेटायला का गेले नाहीत?”

त्यावर ओमराजे निंबाळकर यांनी “कैलास पाटील गेले होते, आम्ही पण जाणार आहोत,” असे म्हटल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येते. यावर संबंधित मराठा तरुणाने “तुम्ही शिंदे शिवसेनेत आणि कैलास पाटील ठाकरे शिवसेनेत आहेत, हे कसं चालणार?” असा सवाल केल्याचे ऐकायला येत आहे. दरम्यान, या ऑडिओ क्लिपच्या सत्यते संदर्भात tv9 मराठी चॅनलने दुजोरा देत नाही. मात्र, क्लिपमुळे ओमराजे निंबाळकर आणि मराठा आंदोलनाच्या त्यांच्या भूमिकेवरून चर्चा रंगली असून ही ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल होत आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच