125 किलोमीटर वेगाने विनाशकारी चक्रीवादळ धडकणार, मोठा इशारा, अरबी समुद्रात..
Cyclone Murasu Alert : मोठे संकट येत आहे. चक्रीवादळाचा मोठा अलर्ट जारी करण्यात आला. या चक्रीवादळादरम्यान जोरदार पाऊस असेल. त्यातच प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचे बघायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला.

अर्नब चक्रीवादळाचा मोठा फटका बसत आहे. अनेक राज्यात या चक्रीवादळाने थैमान घातले. मोठे नुकसान होत आहे. महाराष्ट्रासाठी हे चक्रीवादळ दिलासादायक ठरले आहे. राज्यात दुष्काळ असून या चक्रीवादळामुळे पाऊस कोसळत आहे. त्यामुळे थोडा का होईना दिलासा मिळाला. बंगालच्या उपसागरात आणखी एक वादळी प्रणाली वेगाने तीव्र होऊ लागली आहे. ज्यामुळे धोका अधिक वाढला. या नवीन वादळाला मुर्सु असे दिले गेले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवार 1 नोव्हेंबरपर्यंत ही प्रणाली एका चक्रीवादळाचे रूप घेऊ शकते. त्यानंतर, सोमवार 2 नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत हे वादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला. अर्नब चक्रीवादळ कायम असताना असून एक चक्रीवादळ तयार झाले.
यादरम्यानच ताशी 125 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस किनारपट्टीच्या भागांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतील. जोरदार वाऱ्यासह पाऊस होईल. प्रशासनाची प्रत्येक बारीक गोष्टीवर नजर आहे. ही वादळ जसे जसे पुढे सरकेल, तसे त्याची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. अर्नब चक्रीवादळानंतर निर्माण होणारी नवीन प्रणाली किनारपट्टी भागात मोठे आव्हान ठरतंय.
आज आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात मोठे संकट असणार आहे. दक्षिण ओडिसा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतातील अनेक राज्यात आज मुसळधार पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, आग्नेय बंगालचा उपसागर आणि अंदमान व निकोबार बेटांच्या परिसरात एक स्पष्ट कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते पश्चिम-वायव्य दिशेने सरकत आहे.
आज राज्यातील अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला. अरबी मसुद्रात या चक्रीवादळादरम्यान चांगलाच खवळेल. मोठ्या लाटा उसळताना दिसतील. 1 नोव्हेंबर रोजी ओडिसासह आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस असेल. बंगालच्या उपसागरात हवामान प्रणाली अधिक तीव्र होत आहे. पुढील दोन दिवस अनेक भागात या चक्रीवादळामुळे धो धो पाऊस होऊ शकतो.