Yavatmal Crime | यवतमाळात मारहाण करून दोघांना लुटले; दोन आरोपी लोहारा पोलिसांच्या ताब्यात

| Updated on: Apr 29, 2022 | 4:23 PM

फिर्यादीकडून त्यांचे मोबाईल आरोपींनी हिसकावून घेतले. शिवाय सतरा हजार रुपयांची रोख रक्कमही लुटली. मुद्देमाल घेऊ आरोपींनी पळ काढला. पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांनी तत्काल दखल घेतली. आरोपींच्या दिशेने पाठलाग केला.

Yavatmal Crime | यवतमाळात मारहाण करून दोघांना लुटले; दोन आरोपी लोहारा पोलिसांच्या ताब्यात
यवतमाळात मारहाण करून दोघांना लुटले
Image Credit source: tv 9
Follow us on

यवतमाळ : यवतमाळ येथील बेरार फायनान्स कंपनीमध्ये (Berar Finance Company) कामानिमित्त दोघे जण आले होते. त्या दोघांना मारहाण करून 48 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हिसकावून लुटले. ही घटना दारव्हा मार्गावर असलेल्या न्यू ताज सर्विसेस जवळ घडली. ही घटना 27 मेच्या मध्यरात्री घडली. महागाव तालुक्यातील (Mahagaon Taluka) काऊरवाडी येथील यशवंत मधुकर वळसे (वय 33) असे फिर्यादीचे नाव आहे. हा तरुण बेरार फायनान्स कंपनीमध्ये काम करतो. मित्र अमोल प्रकाश कापसे याच्यासोबत यवतमाळ येथे कामानिमित्त आले होते. न्यू ताज सर्विसेसजवळ (New Taj Services) आडोसा घेऊन असलेल्या काही तरुणांनी त्यांची वाट अडवून दोघांनाही मारहाण केले. तसेच दोन मोबाईल व 17 हजार 500 रुपयाची रोख असा एकूण 48 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हिसकावून पळ काढला. घटनेनंतर त्यांनी लोहारा पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी रीतसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लोहारा पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

अशी घडली घटना

काऊरवाडीतील यशवंत व अमोल हे यवतमाळला आले होते. हे दोघेही रात्री काऊरवाडी गावाकडं परत जात होते. दरम्यान, दोन आरोपींनी त्यांना अडविले. कहा जा रहे हो, असं विचारलं. त्यानंतर त्यांच्याकडून त्यांचे मोबाईल हिसकावून घेतले. शिवाय सतरा हजार रुपयांची रोख रक्कमही लुटली. मुद्देमाल घेऊ आरोपींनी पळ काढला. पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांनी तत्काल दखल घेतली. आरोपींच्या दिशेने पाठलाग केला. दोन जणांना ताब्यात घेतले आहे. हे दोघेही भुरटे चोर आहेत की, त्यांनी यापूर्वी काही जणांना लुटले याचा शोध आता पोलीस घेत आहेत. मध्यरात्री झालेल्या या लुटीमुळं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.