Sachin Kharat : यवतमाळातील पुसदमध्ये दलित समाजाला मारहाण, समाजकंटकांना अटक करा, दलितांना सुरक्षा देण्याची सचिन खरातांची मागणी

यवतमाळ जिल्ह्यातील कारला गावामध्ये दलित समाजानं बाबासाहेबांचं गाणं लग्नसमारंभात लावलं. याला विरोध करण्यासाठी काही समाजकंटकांनी दलित समाजाच्या लोकांना मारहाण केली. त्यानंतर दलित समाजावर बहिष्कार टाकल्याचं कळतंय.

Sachin Kharat : यवतमाळातील पुसदमध्ये दलित समाजाला मारहाण, समाजकंटकांना अटक करा, दलितांना सुरक्षा देण्याची सचिन खरातांची मागणी
समाजकंटकांना अटक करा, दलितांना सुरक्षा देण्याची सचिन खरातांची मागणी
| Edited By: | Updated on: Jul 28, 2022 | 10:57 PM

यवतमाळ : जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील कारला या गावात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. दलित समाज बांधवांनी लग्नसमारंभमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी वाजवली. याला विरोध म्हणून दलित समाजाला समाजकंटकांनी जबर मारहाण केली. तसेच गावातील दलित समाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे असे समजते. आजही राज्यात डॉ. बाबासाहेब यांचे गाणं लावले म्हणून मारहाण करणे हे अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या प्रकरणी लक्ष घालावे. समाजकंटकांना ॲट्रॉसिटी अंतर्गत अटक करून या दलित समाजाला सुरक्षा दयावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्ष करत आहे. अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) राष्ट्रीय अध्यक्ष (National President) सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केली आहे.

कारल्यात नेमकं काय घडलं

यवतमाळ जिल्ह्यातील कारला गावामध्ये दलित समाजानं बाबासाहेबांचं गाणं लग्नसमारंभात लावलं. याला विरोध करण्यासाठी काही समाजकंटकांनी दलित समाजाच्या लोकांना मारहाण केली. त्यानंतर दलित समाजावर बहिष्कार टाकल्याचं कळतंय. या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) निषेध करत आहे. ज्या समाजकंटकांनी ही मारहाण केली त्यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीअंतर्गत कारवाई व्हावी. हे राज्य फुले, शाहू, आंबेडकरांचं राज्य आहे. या राज्यात अशी घटना घडणं अत्यंत निंदनीय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेकडं त्वरित लक्ष घालावं. मारहाण करणाऱ्या समाजकंटकांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करून अटक करावी. दलित समाजाला पूर्णवेळ सुरक्षा द्यावी. अशी मागणी आरपीआय खरात पक्ष करत आहे. ही घटना अत्यंत निंदनीय आहे. या घटनेमागे कोण आहेत. याचा शोध पोलिसांनी घ्यावा. अशा प्रवृत्तींचा नाईनाट करावा, अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.