AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळताच झिशान सिद्धीकी यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हटले, मी..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काही वेळापूर्वीच विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. अखेर पक्षाने झिशान सिद्धीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. अनेक नावे यादरम्यान चर्चेत होती. मात्र, सर्वांनी झिशान सिद्धीकी यांच्या नावाला पसंती दिली.

विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळताच झिशान सिद्धीकी यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हटले, मी..
Zeeshan Siddiqui
| Updated on: Apr 30, 2026 | 10:59 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेची उमेदवारी नक्की कोणाला मिळणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये रात्री उशिरा बैठक यासंदर्भात सुरू होती. रात्रीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेच्या उमेदवाऱ्याच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र, अखेर अनेक मोठ्या घडामोडींनंतर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेच्या उमेदवाऱ्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. विधान परिषदेसाठी अनेकजण इच्छुक होते. शेवटी झिशान सिद्धीकी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी झिशान सिद्धीकी यांच्या नावाला पसंती दिली. सुरूवातीपासूनच विधान परिषदेच्या स्पर्धेत झिशान सिद्धीकी यांचे नाव सर्वात पुढे होते. शेवटी त्यांच्याच गळ्यात विधान परिषदेची उमेदवारी पडली.

विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर झिशान सिद्धीकी यांनी मोठे विधान केले. झिशान सिद्धीकी यांनी म्हटले की, माझ्यासारख्या युवकाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मी कायमच प्रयत्न करेल की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जास्तीत जास्त युवक जोडले कसे जातील याकरिता. अल्पसंख्यांक लोकांसाठी आवाज उठवेल.

मी खरोखरच आभार मानतो की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मला संधी दिली. सुनेत्रा पवार यांनी मला म्हटले की, आपल्याला लोकांसाठी काम करायचे आहे. मी खरोखरच त्यांचा खूप आभारी आहे. प्रफुल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार यांचा मी आभारी आहे. यासोबतच माझे कार्यकर्ते, कुटुंबिय, माझी आई, बहीण यांचा सर्वांचा मी खूप जास्त आभार मानतो.

माझे वडील आणि अजित पवार यांचा आर्शिवाद मला आहे, ते वरून बघत आहेत सर्व. मी आज अर्ज भरण्यासाठी जात असल्याचे सांगतानाही झिशान सिद्धीकी दिसले. आजही मला सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी एका मुलाला संधी देतात तशीच मला त्यांनी संधी दिली. मी त्यांना आज आश्वासन देतो की, फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात मी युवकांना पक्षासोबत सोडण्यासाठी काम करेल.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट