Mobile Banking : पोस्ट ऑफिस मोबाइल बँकिंगमधून कोणत्याही खात्यांत पैसे करा जमा; फंड ट्रान्सफरचा हा नियम जाणून घ्या

मोबाइल बँकिंगच्या मदतीने तुम्ही मुदत ठेव खाते उघडू शकता. मोबाइल अॅपच्या होम पेजवर याचा टॅब दिसेल ज्यावर क्लिक करून आवर्ती ठेव आणि मुदत ठेव खाते उघडता येईल. मात्र, मोबाइल बँकिंगमध्ये खाते बंद करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही

Mobile Banking :  पोस्ट ऑफिस मोबाइल बँकिंगमधून कोणत्याही खात्यांत पैसे करा जमा; फंड ट्रान्सफरचा हा नियम जाणून घ्या
भारतीय पोस्टImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 6:01 PM

मुंबई : इंडिया पोस्टने (India Post) इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग सेवा सुरू केली आहे. कोअर बँकिंग सोल्युशनअंतर्गत ग्राहकांना या दोन्ही बँकिंग सेवा पुरवल्या जात आहेत. इंटरनेट बँकिंग (India Post Internet Banking)आणि मोबाइल बँकिंग सुरू झाल्यानंतर तुम्ही पोस्ट ऑफिस खात्यातील निधी हस्तांतरित करू शकता, तुम्ही खात्यात पैसे जमा करू शकता. अन्य खात्यांमध्येही पैसे जमा करता येतात. आवर्ती ठेव आणि मुदत ठेव खाते उघडता येईल. मात्र, मोबाइल बँकिंगमध्ये खाते बंद करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. मोबाइल बँकिंग (India Post Mobile Banking)किंवा इंटरनेट बँकिंगची सेवा घेण्यापूर्वी रक्कम हस्तांतरणाचा (Fund transfer) नियम काय आहे, हे जाणून घेतले पाहिजे. फंड ट्रान्स्फर द्वारे पैसे कसे मिळवायचे, त्याचा नियम काय? इंडिया पोस्टने आपल्या प्रश्न-उत्तरात (F&Q) ही माहिती दिली आहे.

फंड ट्रान्स्फरबाबत इंडिया पोस्टाने काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. पोस्ट खात्याच्या बचत बँक खात्यातून दुसऱ्या पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक खात्यात किंवा थर्ड पार्टीच्या पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे हस्तांतरित करता येते. इतर खात्यांमध्येही तुम्ही तुमच्या टपाल खात्याच्या बचत बँक खात्यामधून पैसे जमा करू शकता. मोबाइल बँकिंगद्वारे तुमच्या टपाल कार्यालयाच्या बचत बँक खात्यातून तुमच्या आवर्ती ठेव (RD) खात्यात पैसे, आवर्ती ठेव खात्याची परतफेड, पीपीएफ खाते आणि पीपीएफच्या कर्ज खात्यात जमा करता येतात.

कोणत्या खात्यांमध्ये पैसे जमा करता येतील?

मोबाइल बँकिंगच्या मदतीने तुम्ही आरडी आणि टीडी खातेही उघडू शकता. मोबाइल अॅपच्या होम पेजवर याचा टॅब दिसेल ज्यावर क्लिक करून RD आणि TD खाते उघडता येईल. मात्र, मोबाइल बँकिंगमध्ये खाते बंद करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही. याशिवाय इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून आरडी आणि टीडी खाती बंद करता येणार आहे.

मोबाइल बँकिंगच्या इतरही काही मर्यादा आहेत. उदाहरणार्थ, पीपीएफ काढण्याचे पैसे मोबाइल बँकिंगद्वारे प्राप्त होऊ शकत नाहीत. मोबाइल बँकिंगमुळे तुम्हाला ही सुविधा मिळत नाही, पण ही सेवा इंटरनेट बँकिंगमध्ये उपलब्ध आहे. पोस्ट कार्यालय बचत बँक नियमांमध्ये पीपीएफचे किती पैसे इंटरनेट बँकिंगद्वारे घेतले जाऊ शकतात हे सांगितले आहे. मोबाइल बँकिंग बंद करण्यासाठी पोस्ट ऑफिसने खास नियम केले आहेत. यासाठी पोस्ट ऑफिसच्या गृह शाखेशी संपर्क साधून अर्ज करावा लागेल.

असे सुरू करा मोबाइल बँकिंग

https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Form.aspx या लिंकवर क्लिक करून निवेदन अर्ज डाऊनलोड करायचा आहे

• हा फॉर्म भरा आणि काही कागदपत्रांसह पोस्ट ऑफिसमध्ये जमा करा.

• फॉर्म भरल्यानंतर पोस्ट ऑफिस तुमची नोंदणी करेल

त्यानंतर गुगल प्ले स्टोअरवरून इंडिया पोस्ट मोबाइल बँकिंग अॅप डाऊनलोड करा. यामध्ये अॅक्टिव्हेट मोबाईल बँकिंगवर क्लिक करा

त्यासाठी सुरक्षेशी संबंधित काही माहिती द्यावी लागेल जी द्यावी आणि ओटीपी टाकावा.

सक्रियीकरणानंतर, आपल्याला 4-अंकी एमपीन तयार करण्यास सांगितले जाईल

एमपीन टाकल्यावर सबमिटवर क्लिक करा तुमची मोबाइल बँकिंग सेवा सुरू होईल

संबंधित बातम्या :

Non Stop LIVE Update
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.