वसईत 'भूक लगी' हुक्का पार्लरवर छापा, 51 मुली ताब्यात

वसई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ‘भूक लगी’ या हॉटेल मध्ये हुक्का पार्लवर वर छापा टाकण्यात आला आहे. या  छाप्यात 51 मुला मुलींना ताब्यात घेऊन, त्यांच्यावर 200 रुपयांची दंडात्मक कारवाई करुन सोडण्यात आले. दोघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आले आहे. वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या विशेष पथक आणि वालीव पोलिसांनी ही संयुक्त कारवाई …

वसईत 'भूक लगी' हुक्का पार्लरवर छापा, 51 मुली ताब्यात

वसई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ‘भूक लगी’ या हॉटेल मध्ये हुक्का पार्लवर वर छापा टाकण्यात आला आहे. या  छाप्यात 51 मुला मुलींना ताब्यात घेऊन, त्यांच्यावर 200 रुपयांची दंडात्मक कारवाई करुन सोडण्यात आले. दोघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आले आहे.

वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या विशेष पथक आणि वालीव पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. महामार्गावरील सासूनवघर परिसरात भूक लगी हे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये अनाधिकृत रित्या हुक्का पार्लर चालवला जात होता. अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या पथकाला माहिती मिळताच काल शनिवारी रात्री 11 च्या सुमारास छापा टाकला.

या छाप्यात हॉटेल मालक अंकुश थापड, राहुलकुमार मुजुमदार, या दोघांच्या विरोधात सिगारेट, तंबाकू व इतर उत्पादने अधिनियम 2013 चे कलम 22 (1), 4 (क) प्रमाणे वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *