मुंबईतील सीएनजी स्टेशनवरील पुरवठा पूर्वपदावर, वाहनांच्या रांगा ओसरल्या

मुंबईतल्या अनेक पेट्रोल पंपावर CNG भरण्यासाठी वाहनांच्या मोठमोठ्या रांगा पाहायला मिळाल्या होत्या. मात्र रविवारी सकाळच्या सुमारास पंपांवर फारशी गर्दी पाहायला मिळत नाही.

मुंबईतील सीएनजी स्टेशनवरील पुरवठा पूर्वपदावर, वाहनांच्या रांगा ओसरल्या

मुंबई/रायगड : उरणमधल्या ओएनजीसी प्लांटमध्ये (ONGC Plant) झालेल्या बिघाडामुळे गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील सीएनजी (CNG) स्टेशनमधील पुरवठ्यावर परिणाम झाला होता. सीएनजी भरण्यासाठी लागलेल्या वाहनांच्या रांगा रविवारच्या दिवशी कमी झालेल्या दिसत आहेत.

मुंबईतल्या अनेक पेट्रोल पंपावर कालपर्यंत मोठमोठ्या रांगा पाहायला मिळाल्या होत्या. मात्र रविवारी सकाळच्या सुमारास पंपांवर फारशी गर्दी पाहायला मिळत नाही. सीएनजी भरण्यासाठी गेले दोन दिवस टॅक्सी, तसेच खाजगी गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र आज सुट्टीच्या दिवशी वाहनांची तुरळक गर्दी आहे.

सीएनजीमध्ये एलपीजी मिक्स होऊन येत असल्याने सर्वजण चिंतीत होते. कालपर्यंत सीएनजीला प्रेशर मिळत नसल्याचं म्हटलं जात होतं. तसंच चारशे रुपयांचा गॅस वाहनचालकांना 800 ते 900 रुपयांमध्ये घ्यावा लागत होता. त्यामध्ये आज थोडीफार सुधारणा झाली असली आहे. मुंबईत सध्या कोणतंही सीएनजी स्टेशन बंद नाही.

उरणमधील ओएनजीसीच्या गॅस प्रोसेसिंग केंद्रामध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे महानगर गॅस कंपनीला कमी प्रमाणात गॅस पुरवठा होत होता. घरगुती पीएनजी ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय प्राधान्य देत गॅस पुरवण्यात येईल, अशी हमी देण्यात आली होती. मात्र सीएनजी पुरवठा स्थानकांना कमी प्रमाणात गॅस उपलब्ध झाला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *