शिवसेनेला 115-120 जागा देण्यास भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाची तयारी : सूत्र

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra  Assembly Election) कार्यक्रम सोमवारी (16 सप्टेंबर) जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shivsena) युतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे.

शिवसेनेला 115-120 जागा देण्यास भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाची तयारी : सूत्र

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra  Assembly Election) कार्यक्रम सोमवारी (16 सप्टेंबर) जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shivsena) युतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेनेला 115 ते 120 जागा देण्याबाबत राज्यातील नेत्यांना सुचवलं आहे. मात्र, दुसरीकडे शिवसेनेसोबत युती करायची असेल तर किमान 126 ते 128 जागा शिवसेनेला द्याव्या, अशी गळ भाजपच्या राज्यातील नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाला घातली आहे.

शिवसेनेला किमान 126-128 जागा दिल्या तरच शिवसेनेशी सन्मानपूर्वक युती होऊ शकेल आणि काही अडथळा येणार नाही असं राज्यातील भाजप नेत्यांचं मत असल्याचं सांगितलं जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या नेतृत्वाने देखील 125 ते 130 जागांमध्ये सन्मानपूर्वक तोडगा काढण्याची प्राथमिक तयारी दर्शवली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘मातोश्री’त खलबते झाल्याचंही बोललं जातं. 2 दिवसांपूर्वी रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीस ‘मातोश्री’वर गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुचविलेला जागा वाटपाचा फार्म्युला सांगितला.

आता भाजप-शिवसेनेची युती होणार का? झाली तर जागावाटपाचा फॉर्म्युला काय ठरणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *