कोरोनाचं कारण की निवडणुकांची तयारी? नवी मुंबईत राजकीय नेत्यांची वर्दळ वाढली

नवी मुंबईकरांची काळजी असल्याने अनेक मोठे राजकीय नेते नवी मुंबईमध्ये येत (Many political Leader Visit Navi Mumbai election) आहेत.

कोरोनाचं कारण की निवडणुकांची तयारी? नवी मुंबईत राजकीय नेत्यांची वर्दळ वाढली

नवी मुंबई : मुंबईनंतर नवी मुंबई कोरोनाचे हॉट्स्पॉट बनत चालला आहे. नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 7 हजार 088 वर पोहोचली आहे. तर कोरोनाबळींचा आकडा 224 इतकी झाली आहे. मात्र इतके दिवस गायब असलेली नेते मंडळी अचानक नवी मुंबईकडे कशी वळली असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. (Many political Leader Visit Navi Mumbai due to corona pandemic or election)

निव्वळ नवी मुंबईकरांची काळजी असल्याने अनेक मोठे राजकीय नेते नवी मुंबईमध्ये येत आहेत. त्याचं कारणही तसंच आहे. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला की नवी मुंबईत निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे.

आता जर जनतेच्या सेवार्थ राजकीय मंडळी उतरली नाही तर जनता निवडणुकीत ठेंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण या नेत्यांच्या दौऱ्यांनी नवी मुंबईकरांना काही भेटणार आहे की केवळ निराशाच हाती लागणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

फक्त सत्ताधारी नव्हे तर विरोधी पक्षातील पुढारी मंडळींच्याही नवी मुंबईत रांगा लागल्याचं पाहायला मिळतं आहे. काल (3 जुलै) गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबई महापालिकेत बैठक घेतली.

तर आज भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. याआधी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वैयक्तिक सिडको प्रदर्शन सेंटरची पाहणी केली होती.

त्याशिवाय पालकमंत्री एकनाथ शिंदेही नवी मुंबईत आपली पकड मजबूत करीत आहेत. तर गणेश नाईक आपल्या कार्यकर्त्यांच्य साथीने नवी मुंबई मनपा काबीज करण्याच्या तयारीत आहे. पण हा निवडणुकीचा आखाडा कोरोना गेल्याशिवाय रंगणार नाही.  (Many political Leader Visit Navi Mumbai due to corona pandemic or election)

संबंधित बातम्या : 

पवारांच्या सूचनांबाबत मुख्यमंत्र्यांनी ठरवावं, तिन्ही पक्ष एकत्र असल्याचं दिसत नाही : देवेंद्र फडणवीस

थोडेसे मतभेद असतात, पण आम्ही पूर्ण ताकदीने मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी उभे : जितेंद्र आव्हाड

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *