AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थोडेसे मतभेद असतात, पण आम्ही पूर्ण ताकदीने मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी उभे : जितेंद्र आव्हाड

येत्या आठवडाभरात नवी मुंबईकरांसाठी दोन नव्या कोरोना टेस्ट लॅब सुरु करणार असल्याची माहिती आव्हाड यांनी (Jitendra Awhad On NCP-cong  disappointed) दिली.

थोडेसे मतभेद असतात, पण आम्ही पूर्ण ताकदीने मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी उभे : जितेंद्र आव्हाड
| Updated on: Jul 04, 2020 | 12:15 AM
Share

नवी मुंबई : नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबईत महापालिकेत बैठक घेतली. या बैठकीत येत्या आठवडाभरात नवी मुंबईकरांसाठी दोन नव्या कोरोना टेस्ट लॅब सुरु करणार असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली. त्यासोबत ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर, औषध पुरवठा वाढवण्याचे आदेशही पालिका प्रशासनाला दिले. (Jitendra Awhad On Maha vikas aaghadi NCP-cong  disappointed)

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी लॉकडाऊनवरुन राज्य सरकारमध्ये नाराजी नाट्यावर भाष्य केले. “लॉकडाऊनवरुन राज्य सरकारमध्ये थोडेसे मतभेद आहे. मात्र कोरोनाच्या परिस्थिती आम्ही पूर्ण ताकदीने मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.”

नवी मुंबईतील कोरोनाची स्थिती तसेच लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबई महानगरपालिकेत बैठक घेतली होती. या बैठकीला मनपा आयुक्त, आरोग्य विभागाचे अधिकारी हजर होते.

नवी मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7 हजारांच्या वर गेली आहे. नवी मुंबईत दररोज 150 ते 200 रुग्ण वाढत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ज्या उपाययोजना लागतील त्या त्वरीत उभा करण्याचे आदेश मनपा आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांना देण्यात आले आहेत. नवी मुंबईत कोरोना संख्या वाढत आहे. तर कोरोना टेस्ट लॅब अद्याप सुरु होत नसल्याने नवी मुंबईकरांमध्ये नाराजी आहे.

हेही वाचा : महाविकास आघाडीत पुन्हा कुरबुरी, आता राष्ट्रवादीची नाराजी

राज्य सरकारने महाराष्ट्रात अनलॉकिंग करताना, जे निर्बंध घातले होते ते 31 जुलैपर्यंत कायम ठेवले. मात्र हा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नसल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. दरम्यान या कुरबुरीच्या पार्श्वभूमीवर आज (3 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. ही बैठक जवळपास 1 तास सुरु (Jitendra Awhad On Maha vikas aaghadi NCP-cong  disappointed) होती.

संबंधित बातम्या : 

कुरबुरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि आदित्य ठाकरेंसोबत शरद पवारांची तासभर चर्चा

कुरबुरीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी, मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या भेटीपूर्वी संजय राऊत ‘सिल्व्हर ओक’वर

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.