मुंबईवर पुन्हा 26/11 सारखा हल्ला?

मुंबई : मुंबईवर पुन्हा एकदा 26/11 सारखा हल्ला होऊ शकतो, अशी भीती नौदल प्रमुख सुनिल लांबा यांनी व्यक्त केली आहे. तसेच, आपला शेजारील देश (पाकिस्तान) समुद्र मार्गानं हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असल्याचं लांबा यांनी म्हटलं आहे. शिवाय, दहशतवाद्यांना पाकिस्तान पैसा पुरवत आहे. त्यामुळे जगासमोर मोठं आव्हान उभं असल्याचं देखील नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी […]

मुंबईवर पुन्हा 26/11 सारखा हल्ला?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : मुंबईवर पुन्हा एकदा 26/11 सारखा हल्ला होऊ शकतो, अशी भीती नौदल प्रमुख सुनिल लांबा यांनी व्यक्त केली आहे. तसेच, आपला शेजारील देश (पाकिस्तान) समुद्र मार्गानं हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असल्याचं लांबा यांनी म्हटलं आहे. शिवाय, दहशतवाद्यांना पाकिस्तान पैसा पुरवत आहे. त्यामुळे जगासमोर मोठं आव्हान उभं असल्याचं देखील नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी म्हटलं.

जम्मू-काश्मीर येथील पुलावामा जिल्ह्यात 14 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आयईडी स्फोट घडवला. या स्फोटात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. त्यानंतरही गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केले जात आहे. शिवाय, भारत-पाकिस्तान सीमेवरही तणावाची स्थिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतातील सुरक्षा व्यवस्थेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

आता पाकवर नेव्हीचा स्ट्राईक? भारतीय पाणबुडी घुसल्याचा पाकचा दावा

याचवेळी भारतीय नौदलप्रमुख सुनिल लांबा यांनी 26/11 सारखा मुंबईवर पुन्हा हल्ला होण्याची भीती वर्तवल्याने, सगळ्यांचीच चिंता आणखी वाढली आहे.

Non Stop LIVE Update
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.