राज ठाकरे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला, मुलाची लग्नपत्रिका अर्पण

मुंबई: मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे यांचं 27 जानेवारीला मुंबईत लग्न होत आहे. या लग्नाची पत्रिका घेऊन राज आणि शर्मिला ठाकरे सिद्धिविनायक मंदिरात गेले. नववर्षानिमित्त दोघांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन, मुलाच्या लग्नाची पत्रिका श्रीचरणी ठेवली. मुलाची लग्नपत्रिका सप्तश्रृंगीच्या चरणी राज […]

राज ठाकरे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला, मुलाची लग्नपत्रिका अर्पण
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई: मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे यांचं 27 जानेवारीला मुंबईत लग्न होत आहे. या लग्नाची पत्रिका घेऊन राज आणि शर्मिला ठाकरे सिद्धिविनायक मंदिरात गेले. नववर्षानिमित्त दोघांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन, मुलाच्या लग्नाची पत्रिका श्रीचरणी ठेवली.

मुलाची लग्नपत्रिका सप्तश्रृंगीच्या चरणी

राज ठाकरेंचा मुलगा अमितचं लग्न 27 जानेवारी 2019 रोजी मुंबईत होणार आहे. लोअर परळ इथल्या सेंट रेजिस इथं हा लग्नसोहळा पार पडेल. अमित आपली मैत्रीण मिताली बोरुडेसोबत लगीनगाठ बांधणार आहे. राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यात अमितची लग्नपत्रिका नाशिकमधील सप्तश्रृंगी देवीच्या चरणी ठेवली. अमित ठाकरेंच्या लग्नपत्रिकेत 5 नावं आहेत.अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा साखरपुडा गेल्या वर्षी डिसेंबर 2017 मध्ये पार पडला.

लग्नसोहळा मोठ्या प्रमाणात नाही

दरम्यान, लग्नसोहळा मोठ्या प्रमाणात नसेल, असं राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची यादी काढली तर लाखोंच्या घरात निमंत्रण द्यावं लागले. तुमच्या हौसेसाठी म्हणून त्या नवदाम्पत्याची ससेहोलपट करायची हे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे लग्नसोहळा मोठ्या प्रमाणात नसेल, असं राज ठाकरे म्हणाले होते.

संबंधित बातम्या

अमितच्या लग्नपत्रिकेत 5 नावं, लग्नासाठी किती जणांना निमंत्रण?  

कशी आहे राज ठाकरेंच्या मुलाची लग्नपत्रिका? 

Non Stop LIVE Update
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.