नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते संघटनावाढीच्या दृष्टीने काम करत आहेत. त्यांनी गेल्या चार दिवसात अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर आज राज ठाकरे नाशिकमधील वणी गडावर दाखल झाले. राज ठाकरे फनूनिक्युलर ट्रॉलीत बसून दर्शनासाठी रवाना झाले. सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेऊन राज ठाकरे यांनी देवीच्या चरणी मुलगा अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिका अर्पण केली. […]
नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते संघटनावाढीच्या दृष्टीने काम करत आहेत. त्यांनी गेल्या चार दिवसात अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर आज राज ठाकरे नाशिकमधील वणी गडावर दाखल झाले. राज ठाकरे फनूनिक्युलर ट्रॉलीत बसून दर्शनासाठी रवाना झाले. सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेऊन राज ठाकरे यांनी देवीच्या चरणी मुलगा अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिका अर्पण केली. यावेळी राज ठाकरेंसबोत मनसे नेते बाळा नांदगावकर आणि अन्य स्थानिक नेते उपस्थित होते.अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाह 27 जानेवारी 2019 रोजी मुंबईत होणार आहे. अमित ठाकरेंच्या लग्नपत्रिकेत 5 नावं आहेत.राज ठाकरेंची आई मधुवंती श्रीकांत ठाकरे, सासू पद्मश्री मोहन वाघ यांच्यासह मुलगी उर्वशी, पत्नी शर्मिला आणि स्वत: राज ठाकरे यांचं नाव आहे.अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा साखरपुडा गेल्या वर्षी डिसेंबर 2017 मध्ये पार पडला. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये हा साखरपुडा सोहळा झाला होता.अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे हे जुने मित्र आहेत. या ओळीचं प्रेमात आणि आता विवाहबंधनात रुपांतर होणार आहे. मिताली ही प्रसिद्ध सर्जन संजय बोरुडे यांची कन्या आहे.मिताली आणि राज ठाकरेंची मुलगी उर्वशी यांचीही चांगली मैत्री आहे. या दोघींनी ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.अमित ठाकरेंच्या लग्नपत्रिकेत 5 नावं आहेत. यामध्ये राज ठाकरेंची आई मधुवंती श्रीकांत ठाकरे, सासू पद्मश्री मोहन वाघ यांच्यासह मुलगी उर्वशी, पत्नी शर्मिला आणि स्वत: राज ठाकरे यांचं नाव आहे.अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा साखरपुडा गेल्या वर्षी डिसेंबर 2017 मध्ये पार पडला. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये हा साखरपुडा सोहळा झाला होता. अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे हे जुने मित्र आहेत. या ओळीचं प्रेमात आणि आता विवाहबंधनात रुपांतर होणार आहे.