
मोठी बातमी समोर येत आहे, गुजरातमध्ये मोठा भूकंप झाला आहे. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात अवघ्या 4 तासांमध्ये भूकंपाचे एकामागून एक तब्बल 11 धक्के जाणवले आहेत. अचानक आलेल्या या मोठ्या संकटामुळे जिल्ह्यातील लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहेत, नागरिक प्रचंड घाबरले आहेत. भूकंपाचा पहिला धक्का जाणवताच नागरिकांनी घराच्या बाहेर धाव घेतली. त्यानंतर एकामागून एक भूकंपाचे धक्के जाणवत असल्यामुळे आता लोक घरात जायला देखील घाबरू लागले आहेत. हे सर्व भूकंपाचे धक्के सौम्य होते, यामध्ये फार काही नुकसान झालेलं नाही, 2.7 ते 3.8 रिस्टर स्केल एवढ्या तीव्रतेचे हे भूकंप होते.
समोर आलेल्या माहितीनुसार गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातल्या उपलेटा परिसरात शुक्रवारी सकाळच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत, उपलेटा परिसरात अवघ्या 4 तासांमध्ये तब्बल 11 भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज सकाळी पहाटे 6.19 पहिला भूकंपाचा धक्का जाणवला हा पहिला भूकंपाचा धक्का 3.8 रिस्टल स्केल एवढा तीव्रतेचा होता. त्यानंतर एका पाठोपाठ 10 भूकंपाचे धक्के जाणवले, शेवटाचा भूकंपाचा धक्का 2.7 रिस्टल स्केल एवढ्या तीव्रतेचा होता.
दरम्यान त्यापूर्वी गुरुवारी देखील रात्री याच परिसरात 8 वाजून 43 मिनिटांनी एक भूकंपाचा धक्का जाणवला होता, ज्याची तीव्रता 3.3 रिस्टल स्केल एवढी होती. या सर्व भूकंपाचा केंद्र बिंदू हा उपलेटापासून 27 किलोमीटर दूर अंतरावर आहे. उपलेटामध्ये तर भूकंपाचे धक्के जाणवलेच परंतु उपलेटासोबतच जेतपूरमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दरम्यान या भूकंपाच्या धक्क्यानंतर स्थानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे लोक घटनास्थळी दाखल झाले आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क राहावे असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
लोकांमध्ये भीती
दरम्यान गुजरातमध्ये 2001 साली मोठा भूकंप आला होता, या भूकंपामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला. या आठवणी आजही तेथील अनेक नागरिकांच्या मनामध्ये आहेत, त्यामुळे भूकंपाचे धक्के जाणवताच लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.