
मौनी अमावस्याच्या दिवशी प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभात चेंगराचेंगरी झाली. या घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाल्या. या घटनेने 3 फेब्रुवारी 1954 मधील घटनेच्या आठवणी ताज्या केल्या. त्या दिवशी सकाळी 8 वाजता प्रयागराजमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. लाखोंच्या गर्दीत काही अफवा पसरल्या. त्यानंतर 45 मिनिटे गोंधळ उडला. चेंगराचेंगरी झाली. त्यात 800 भाविकांचा मृत्यू झाला होता. त्या कुंभमेळ्यात देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूसुद्धा आले होते.
यंदा महाकुंभात चेंगराचेंगरीची दुर्घटना रात्री एक वाजता घडली. यावेळी संगमावर मौनी अमावस्यानिमित्त स्नान करण्यासाठी गर्दी निर्माण झाली होती. मुख्य संगमावरच स्नान करण्याचा अट्टहास धरला जात होता. गर्दी वाढल्यामुळे संगम रस्त्यावर असलेले बॅरीकेड तुटून गेले. त्यानंतर चेंगराचेंगरी सुरु झाली. मीडिया रिपोर्टनुसार, लोक स्नानासाठी जात असताना बॅरिकेडिंगजवळ लोक झोपलेले होते. त्यामुळे झोपलेल्या लोकांच्या पायात अडकून काही लोक खाली पडले. ते पडताच मागून येणाऱ्या लोकांची गर्दी एकावर एक कोसळत राहिली.
1954 च्या कुंभवेळी चेंगराचेंगरी झाली होती. 2 आणि 3 फेब्रुवारीच्या मध्यरात्री गंगेच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. संगमाच्या काठावरील साधू-मुनींच्या आश्रमात पाणी पोहोचू लागले. या घटनेने लोक भयभीत झाले. यामुळे गोंधळात चेंगराचेंगरी झाली. कुंभचे आंतरराष्ट्रीयीकरणही तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. या निमित्ताने नेहरूंचे अनेक लेख भारतात आणि परदेशातही प्रसिद्ध झाले. त्या वर्षी सुमारे 50 लाख भाविक महाकुंभात सहभागी झाले होते. त्या दिवशी अशी एक अफवा पसरली की पंतप्रधान नेहरू यांचे हेलिकॉप्टर येत आहे. या अफवेवर विश्वास ठेवून काही लोक त्यांना पाहण्यासाठी धावू लागले. या गोंधळामुळे काही नागा साधू संतप्त झाले आणि त्यांनी चिमट्याने हल्ला केला. यामुळे आणखी अनागोंदी माजली.
1954 च्या कुंभवेळी चेंगराचेंगरी घटनेनंतर पंडित नेहरू यांनी न्यायमूर्ती कमलाकांत वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली. त्यानंतर नेहरू यांनी राजकीय नेते आणि व्हीआयपींना कुंभ स्नानाच्या उत्सवात न जाण्याचे आवाहन केले होते. त्या घटनेनंतर बराच काळ कुंभमध्ये चेंगराचेंगरी झाली नाही. चेंगराचेंगरीच्या घटनेला आणखी एक अफवा कारणीभूत आहे. गंगा नदीने आपला मार्ग बदलला, अशी अफवा पसरली.