
प्रवासात कायम छोट्या – मोठ्या गोष्टी घडत असतात. पण आता तर धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. सहारनपूर जंक्शन रेल्वे स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडली आहे. हावडा – अमृतसर मेल ट्रेलमध्ये मध्यरात्री एक महिला नवरा आणि दोन वर्षाच्या मुलीसोबत चढते. ट्रेनमध्ये चढताच नवरा – बायको आणि चिमुकली देखील झोपते. त्यानंतर रात्री 12.30 संपूर्ण ट्रेनमध्ये खळबळ माजते. त्यामुळे जीआरपी त्यांना विचारतात ‘नक्की झालं तरी काय?’ तेव्हा कळतं की, 2 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण झालं आहे.
मुलीची आई नेहा हिने सांगितल्यानुसार, ‘पती आणि मुलीसोबत रात्री 11 वाजता धामपूर येथून ट्रेनमध्ये बसली. ट्रेनमध्ये सीट मिळाल्यानंतर मी लेक नायरा हिला घेऊन झोपली आणि पती फोन पाहत होते. काही वेळानंतर पती देखील झोपले. याचदरम्यान, मी रात्री 12 वाजता उठली, तेव्हा नायरा माझ्या बाजूला होती.’
‘जेव्हा ट्रेल अंबालाच्या आधी जगाधरी स्टेशववर पोहोचली मला जाग आली तेव्हा माझी मुलगी माझ्यासोबत नव्हती.’ मुलगी गायब झाल्याचं कळताच, पत्नी – पतीने संपूर्ण ट्रेनमध्ये मुलीची शोधाशोध केली. पण मुलगी कुठेच भेटली नाही.
कुटुंबाने तात्काळ ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस आणि प्रवाशांनी मिळून ट्रेनमध्ये शोध मोहीम राबवली, परंतु मुलगी सापडली नाही. त्यानंतर या जोडप्याला सहारनपूर जीआरपी पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले. जेथे मुलीचं अपहरण झाल्याचीच तक्रार नोंदवण्यात आली.
सहारनपूर रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आलं. बुरखा घातलेली एक महिला मुलीला खांद्यावर घेऊन प्लॅटफॉर्मवर जाताना दिसत होती. पण व्हिडीओमध्ये महिलेचा चेहरा स्पष्ट दिसला नाही. कारण तिने बुरखा घतला होता.
नेहा खान पुढे म्हणाली की, ट्रेनमध्ये तिच्या शेजारी बसलेल्या एका प्रवाशाने तिला सांगितलं की एक महिला तिच्या शेजारी येऊन बसली होती आणि तिने मुलीला उचललं आणि सहारनपूर स्टेशनवर थांबण्यापूर्वी ट्रेनमधून उतरली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत, जीआरपी मुरादाबादचे एसपी आशुतोष शुक्ला म्हणाले, त्यांना पहाटे 3:30 वाजता या घटनेची माहिती मिळाली.
मुलीच्या बेपत्ता होण्याची बातमी मिळताच, ट्रेनमध्ये तैनात असलेल्या एस्कॉर्ट कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली आणि ट्रेनचा शोध घेण्यात आला, परंतु मुलगी सापडली नाही. यानंतर, सहारनपूर रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये एक महिला मुलीला स्टेशनवर घेऊन जाताना दिसली.
पोलिसांनी मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे आणि महिलेची ओळख पटविण्यासाठी आणि मुलीचा शोध घेण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस मुलिचा शोध घेत आहेत. लवकरच मुलीला सुरक्षितपणे वाचवू… असा आश्वसन पोलिसांनी मुलीच्या आई – वडिलांना दिलं आहे.