जगातील शक्तीशाली लष्कर अमेरिकेकडे, पाकिस्तानचा नंबर नववा.. भारताचा क्रमांक कितवा ? पाहा

| Updated on: Jan 17, 2024 | 12:37 PM

जगातील शक्तीशाली लष्कर ज्यांच्याकडे आहे त्यांना जगात सर्व टरकून असतात. भारताचे लष्कर देखील जगातील एक ताकदवान लष्कर म्हणून पाहीले जाते. सध्या चीनच्या कुरापती सुरु असल्याने आपल्या भारताची आणि चीनची तुलना नेहमी होत असते. तर पाहूयात भारताच्या लष्कराचा जगात कितवा क्रमांक आहे.

जगातील शक्तीशाली लष्कर अमेरिकेकडे, पाकिस्तानचा नंबर नववा.. भारताचा क्रमांक कितवा ? पाहा
indian army
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

नवी दिल्ली | 17 जानेवारी 2024 : आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आपले जवान 24 तास डोळ्यात तेल घालून सीमांवर पहारा देत असतात. त्यामुळेच आपण सुखाने झोपू शकतो. परंतू जगातील सर्वात शक्तीशाली लष्कराचा विषय निघाला तर सुपरपॉवर अमेरिकेचा नंबर लागतो. अलिकडेच ग्लोबर फायर पॉवर 2024 ची यादी जाहीर झाली आहे. त्यात जगातील ताकदवान सैन्यांची माहीती दिली आहे. या यादीत अमेरिका पहिला असून आपला कट्टर दुश्मन शेजारी पाकिस्तान या यादीत 9 व्या क्रमांकावर आहे. तर कमी ताकद असलेल्या सैन्याच्या यादीत सर्वात पहिला क्रमांक भूतानचा आहे. आपला देश या यादीत कितवा आहे? पाहूयात….

ग्लोबल फायरपॉवर मिलिट्री स्ट्रेंथ रॅंकींग 2024 ची यादी जाहीर झाली आहे. यात सुपरपॉवर अमेरिका या यादीत टॉपवर आहे. त्यानंतर सध्या युक्रेन सोबत युद्ध करणाऱ्या रशियाचा क्रमांक या यादीत दुसरा आहे. आपला शेजारी आणि दगाबाज अशा चीनचा या यादीत तिसरा क्रमांक आलेला आहे. या तीन देशांनंतर आपल्या भारताचे लष्कर 4 थ्या क्रमांकावर आहे. तर पाचव्या क्रमांकावर दक्षिण कोरियाचा नंबर लागला आहे. तसेच या यादीत 6 व्या क्रमांकाचे लष्कर ब्रिटनचे असल्याचे म्हटले आहे. सातव्या क्रमांकावर जपान, 8 व्या क्रमांकावर तुर्की, 9 व्या क्रमांकावर आपला शेजारी पाकिस्तान तर दहाव्या क्रमांकावर इटलीच्या लष्कराचा क्रमांक लागत आहे.

कमी ताकदीच्या सैन्य दलाची यादी

या यादीत सर्वात कमी ताकदीच्या सैन्य असलेल्या देशांची देखील नावे आहेत. सर्वात कमजोर सैन्यांच्या या यादीत पहिला क्रमांकावर भूतान आहे. दुसऱ्या क्रमांकावर मोल्दोवा आणि तिसऱ्या क्रमांकावर सुरीनामे या देशाचे नाव आहे. यानंतर सोमालिया, बेनिन, लायबेरिया, बेलीज, सियेरा लियोन, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक आणि 10 व्या क्रमांकावर आईसलॅंडचा क्रमांक आहे.