२५ लाख सरकारी नोकऱ्या, पदवीधर बेरोजगारांना महिना ५ हजार भत्ता, सपाचा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जाहीरनामा जाहीर

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी २०२७ विधानसभा निवडणूकीसाठीचा आपला जाहीरनामा प्रसिद्ध करुन आघाडी घेतली आहे.

२५ लाख सरकारी नोकऱ्या, पदवीधर बेरोजगारांना महिना ५ हजार भत्ता, सपाचा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जाहीरनामा जाहीर
pda manifesto for up assembly election
| Updated on: Nov 26, 2026 | 7:34 PM

उत्तर प्रदेशात नव्या वर्षात विधानसभा निवडणूका होणार आहे.यामुळे राजकीय मोर्चेबांधणी सुरु असताना समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी साल २०२७ च्या विधानसभा निवडणूकीसाठी आपला जाहीरनामा जाहीर केला आहे. पक्षाने याला ‘पीडीएचे प्रणपत्र’असे नाव दिले आहे. यात पाच वर्षांत २५ लाख सरकारी नोकऱ्यांचे आश्वासन दिले आहे. पेपर फुटी विरोधात कठोर नियम आणि बेरोजगार युवकांना ५ हजार रुपयांचा भत्ता देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर गॅरंटी आणि ग्रामीण भागात ३०० युनिट मोफत विज देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकांसाठी समाजवादी पार्टीने काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्याला पीडीएचे प्रणपत्र असे संबोधले आहे. या जाहीरनाम्यात युवकांना रोजगार, शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किमतीची (MSP) कायदेशीर हमी, मोफत वैद्यकीय उपचार, महागाई नियंत्रण, युपीची कायदा आणि सुव्यवस्था सुधारणे आणि समाजातील विविध घटकांसाठी इतर महत्त्वाच्या लाभांची आश्वासने समाविष्ट आहेत. आपल्याला सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा असल्याचे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. आपल्या जाहीरनाम्यात, पक्षाने म्हटले आहे की, त्यांना एक असे सर्वसमावेशक राष्ट्र घडवायचे आहे जे सर्वांना समान संधी देईल. संविधानाचे आणि आरक्षणाचे संरक्षण करणे, गरिबांचा सन्मान करणे आणि महिलांचे संरक्षण करणे ही आमची प्राथमिकता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Loading...

येथे पोस्ट वाचा –

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us