AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पॅरिसमध्ये भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय; BAPS मंदिराच्या ‘ओपन डे’ निमित्त 43 देशांचे प्रतिनिधी एकत्र

युनेस्कोच्या भारत-फ्रान्स सांस्कृतिक 'ओपन डे' निमित्त पॅरिसमधील नवनिर्मित BAPS स्वामीनारायण हिंदू मंदिरात एक ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय सोहळा पार पडला. या विशेष कार्यक्रमात 43 देशांमधील 50 हून अधिक युनेस्को राजदूत आणि वरिष्ठ प्रतिनिधी सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश देण्यासाठी एकत्र आले होते.

पॅरिसमध्ये भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय; BAPS मंदिराच्या 'ओपन डे' निमित्त 43 देशांचे प्रतिनिधी एकत्र
पॅरिसमध्ये भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय; BAPS मंदिराच्या 'ओपन डे' निमित्त 43 देशांचे प्रतिनिधी एकत्र
| Updated on: Sep 12, 2026 | 7:56 PM
Share

युनेस्कोच्या भारत-फ्रान्स सांस्कृतिक ‘ओपन डे’निमित्त पॅरिसमधील बुसी-सेंट-जॉर्जेस येथील नवनिर्मित BAPS स्वामीनारायण हिंदू मंदिरात एक ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय सोहळा पार पडला. या विशेष कार्यक्रमात 43 देशांमधील 50 हून अधिक युनेस्को राजदूत आणि वरिष्ठ प्रतिनिधी एकत्र आले होते. युनेस्कोमधील भारताच्या स्थायी प्रतिनिधीमंडळाने आयोजित केलेल्या या उपक्रमात युरोप, आफ्रिका, आशिया, अरब देश, अमेरिका आणि कॅरिबियन क्षेत्रातील उच्चपदस्थांनी हजेरी लावत सांस्कृतिक एकात्मतेचा आणि सामायिक मूल्यांचा अनोखा संदेश दिला.

‘मेड इन इंडिया, बिल्ट इन फ्रान्स’

युनेस्को मुख्यालयातून प्रवास करून आलेल्या पाहुण्यांनी सुरुवातीला पारंपरिक भारतीय भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर एका विशेष लघुपटाद्वारे शतकानुशतके जुनी भारतीय कलाकुसर आणि अत्याधुनिक फ्रेंच अभियांत्रिकीच्या संगमातून साकारलेल्या या मंदिराची निर्मितीकथा मांडण्यात आली. युनेस्कोमधील भारताचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी महामहिम विशाल शर्मा यांनी उपस्थितांना संबोधित करताना या मंदिराचे वर्णन “भारतात निर्मित, फ्रान्समध्ये उभारलेले आणि जगाद्वारे साजरे केले जाणारे” असे केले. येथे भारतीय सांस्कृतिक वारसा हा केवळ संग्रहालयातील वस्तू म्हणून नव्हे, तर एक जिवंत परंपरा म्हणून खंडांतराचा प्रवास करून आला आहे, असेही ते म्हणाले.

निस्वार्थ सेवा आणि जिवंत वारसा

कार्यक्रमात BAPS च्या स्वयंसेविका भविषा पटेल यांनी परमपूज्य महंत स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने हजारो स्वयंसेवकांनी केलेल्या निस्वार्थ सेवेचे अनुभव सांगितले. केवळ “मी कशी मदत करू शकते?” या साध्या भावनेतून लाखो लोक नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून कोणतीही प्रसिद्धी किंवा मोबदला न घेता कसे कार्य करतात, यावर त्यांनी भाष्य केले. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटरच्या उप-संचालिका ज्योती होसाग्रहार यांनी या वास्तूचे कौतुक करताना म्हटले की, हे मंदिर युनेस्कोला अपेक्षित असलेल्या ‘जिवंत वारसा’ आणि ‘सांस्कृतिक संवादा’चे उत्तम उदाहरण आहे. हे मंदिर सिद्ध करते की वारसा ही एक जिवंत प्रक्रिया असून कलाकुसरीच्या माध्यमातून विविध पार्श्वभूमीच्या लोकांमध्ये परस्पर आदर व सामाजिक एकोपा निर्माण करण्याची क्षमता यात आहे.

मंदिराचे प्रकल्प प्रमुख संजय कारा म्हणाले, “जगभरातील इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या राजदूत आणि प्रतिनिधींचे स्वागत करणे आणि त्यांना या मंदिराचे सौंदर्य व त्यातील मूल्ये समजावून सांगणे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. परमपूज्य महंत स्वामी महाराज यांची अशी इच्छा होती की हे मंदिर शांतता, आदर आणि सामंजस्याच्या भावनेने लोकांना एकत्र आणणारे ठिकाण बनावे. आज येथे 43 देशांचे प्रतिनिधी एकत्र जमले होते, हे त्या दूरदर्शी विचाराचेच एक सुंदर दर्शन होते.”

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान