दुकानदाराचा अनोखा जुगाड, 2000 च्या नोटवर 50% डिस्काउंटची दिली ऑफर

| Updated on: May 28, 2023 | 3:23 PM

2000 Rupees Note : एखादे संकट आले म्हणजे त्यातून अनेक जण संधी शोधत असतात. वाराणसीमधील एका दुकानदाराने असाच जुगाड केला आहे. त्याने दोन हजाराची नोट घेऊन येणाऱ्यांसाठी खास ऑफर सुरु केली आहे.

दुकानदाराचा अनोखा जुगाड, 2000 च्या नोटवर 50% डिस्काउंटची दिली ऑफर
2000 note offer
Follow us on

वाराणसी : आरबीआयने दोन हजाराची नोट चलनातून हटवली आहे. आपल्याकडील नोटा बदलून घेण्यासाठी आरबीआयने देशवासियांना ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. दोन हजाराची नोट पूर्णपणे चलनातून बाहेर काढण्याची आरबीआयने पूर्ण तयारी केली आहे. त्यासंदर्भात सर्व बँकांना गाईडलाईनही जारी केल्या आहेत. त्यानंतर अनेक दुकानदार अन् पेट्रोपंप चालकांकडे दोन हजाराच्या नोटा जास्त येऊ लागल्या आहेत. अनेक ग्राहक 2000 च्या नोटा घेऊन फक्त 100 किंवा 200 खरेदी करतात. यामुळे किरकोळ विक्रीचा मोठा प्रश्न दुकानदारांसमोर उभा राहिला आहे. वाराणसीच्या एका दुकानदाराने ही समस्या सोडवली आहे. अगदी संकट हे संधी समजून ही समस्या सोडवली आहे.

काय केले दुकानदाराने

वाराणसीमधील हा दुकानदार सध्या चर्चेचा विषय बनले आहे. अनेक ठिकाणी दोन हजाराची नोट घेण्यात नाखुशी दाखवत असताना त्याने चक्क ५० टक्के ऑफर सुरु केलीय. या दुकानात वेगवेगळ्या ठिकाणी दोन हजारांच्या नोटांचे चित्र लावले आहे. त्यासोबत ऑफर्स दिली आहे. हा दुकानदार टॅटूचे दुकान चालवतो. त्याने ऑफर देताना म्हटले आहे की, तुम्ही तुमची 2 हजाराची गुलाबी नोट आणा, 2 हजाराची खरेदी करा आणि 50% सूटही मिळवा. अट एवढीच आहे की खरेदी दोन हजार किंवा त्याहून अधिक असावी.

हे सुद्धा वाचा

2000 note offer

ग्राहक असा घेताय फायदा
दुकानदाराच्या म्हणण्यानुसार ग्राहकांना सवलत मिळणार असल्याचे ग्राहक खूश आहे. ऑफर सुरु केल्यापासून दुकानात दोन हजार रुपयांच्या नोटा घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परंतु विक्रीही वाढली आहे. दरम्यान एका ग्राहकाकडे बोट दाखवत दुकानदार म्हणाला, “जसा हा व्यक्ती हातावर चिमणीचे टॅटू काढायला आला होता, पण सवलतीमुळे तो आता गरुडाचा टॅटू काढत आहे.”

दुकानदाराने ही ऑफर लागू केल्यापासून दुकानावर ग्राहकांची गर्दी वाढली आहे. लोक खरेदी करत आहेत आणि आपले टॅटू बनवून घेत आहेत. यामुळे दुकानाचे उत्पन्न तर वाढले आहेच, पण लोकांची 2,000 रुपयांच्या नोटेपासून सुटका होत आहे .