मोठी खळबळ, १४ महिन्यात ७ IPS चे धडाधड राजीनामे, ‘सिंघम’ का घेत आहेत माघार..

युपीएससी परीक्षा देशातील सर्वात अवघड मानली जाते. ही परीक्षा पास झाल्यानंतर मान, सन्मान आणि प्रतिष्ठा देणारी आयएएस आणि आयपीएस तसेच इतर प्रशासकीय सेवेत नोकरी मिळते. मात्र, सध्या आयपीएस अधिकारी धडाधड राजीनामा देत आहेत...

मोठी खळबळ, १४ महिन्यात ७ IPS चे धडाधड राजीनामे, सिंघम का घेत आहेत माघार..
IPS OFFICER
| Updated on: Jul 10, 2026 | 10:09 PM

आयपीएस होण्यासाठी अनेक जण कठोर परिश्रम करत असतात, अनेक तास अभ्यास करुन परीक्षा देतात. मात्र, सध्या देशातील खाकी वर्दीवर अभिमानाने स्टार मिरवणारे आयपीएस धडाधड राजीनामा देत असल्याने चर्चेत आहेत. ताजे प्रकरण आयपीएस अधिकारी जगमोहन मीणा यांचे आहे. ३७ वर्षीय जनमोहन भुवनेश्वरमध्ये डीसीपी होते. आता त्यांनी गुपचूप राजीनामा दिला आहे. जगमोहन भारतीय पोलीस सेवेचे सातवे अधिकारी आहे ज्यांनी गेल्या १४ महिन्यात राजीनामा दिलेला आहे.

फेब्रुवारी २०२६ मध्ये एक प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री ( पीएमओ ) जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सांगितले होते की आयपीएसचे ५०५ पदे अजूनही रिक्त आहेत. या वर्षाच्या सुरुवाताली केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका अहवालात म्हटले आहे की आयपीएस अधिकाऱ्यांच्या कमतरतेने आयबी आणि सीबीआयमधील अनेक पदे रिक्त आहेत.

Loading...

राजीनामा देणारे ६ अधिकारी ४० पेक्षा कमी वयाचे

ज्या अधिकाऱ्यांनी गेल्या १४ महिन्यात राजीनामा दिला आहे. त्यात ६ अधिकाऱ्याचे वय ४० हून कमी आहे. म्हणजे जगमोहन मीणा ३७ वर्षांचे आहेत. तर काम्या मिश्रा यांचे वय ३२ वर्षे आहे. सिद्धार्थ कौशल यांनी राजीनामा दिला तेव्हा त्यांचे वय ३५ वर्षे होते. लोकेश्वर सिंह यांचे वय ३८ वर्षे होते. रचिता जुयाल यांनी जेव्हा राजीनामा दिला,तेव्हा त्यांचे वय ३५ वर्षे होते. तर ३३ व्या वयात अभिषेक तिवारी यांनी राजीनामा दिला आहे.

म्हणजे राजीनामा देणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांचे सरासरी वय ४० वर्षांहून कमी होते. केवळ नुरुल होदा यांचे वय ४० वर्षांहून अधिक आहे.

सिंघमची नोकरी का सोडत आहेत ?

ज्या सात अधिकाऱ्यांनी गेल्या १४ महिन्यात राजीनामा दिला त्यांची डिटेल स्टडीत तीन मोठी कारणे समोर आली आहेत.

1. बिहारच्या नुरुल होदा आणि काम्या मिश्रा यांनी राजकीय कारणांनी राजीनामा दिला आहे. नुरुल यांनी वक्फ बोर्डच्या विरोधात राजीनामा दिला आहे. नुरुल यानंतर राजकारणात प्रवेश करणार आहेत. याच प्रकारे काम्या मिश्रा देखील राजकारणात येण्याचा प्रयत्न करत आहेत.

2. मध्यप्रदेशचे अभिषेक तिवारी याचे प्रकरण वेगळे आहे. तिवारी यांनी सायबर सिक्युरिटी बिझनसमध्ये जाण्यासाठी आपले पद सोडले आहे. त्यांनी पोलिस सेवेत असताना बहुतांश काळ सायबर क्राईमचा तपास करतानाच घालवला आहे.

3. कॉर्पोरेट नोकरीत जाण्यासाठी आंध्रचे आयपीएस सिद्धार्थ कौशल यांनी राजीनामा दिला आहे. आता ते रिलायन्स कंपनीत आहेत. याच प्रकारे उत्तराखंड येथील लोकेश्वर सिंह यांनी राजीनामा देऊन ते युएनला गेले होते. तेथे त्यांना नोकरी मिळाली आहे.

4. ओडिशा काँग्रेसचे अध्यक्ष भक्त चरण दास यांनी म्हटले आहे की ज्या प्रकारे तरुण अधिकारी राजीनामा देत आहेत ते पाहाता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे सरकारने पुढे येऊन स्थिती स्पष्ट केली आहे.

आयपीएस अधिकारी राजीनामा देऊ शकतात ?

ऑल इंडिया सर्व्हीस रुल्स १९५८ मध्ये याची तरतूद आहे. या अधिकाऱ्यांचा राजीनामा केंद्र सरकार स्वीकार करते. राजीनामा जोपर्यंत सरकार स्वीकार करत नाही तोपर्यंत त्यांना त्यांच्या पदावर कायम राहावे लागते.

सर्व्हीस रूल्स ५ (१) च्या मते राजीनामा देणाऱ्या अधिकाऱ्यांनी निवृत्ती नंतर मिळणारे फायदे मिळत नाहीत. मात्र, राज्य सरकारची इच्छा असेल तर दया आधारित भत्ता देऊ शकते.

एवढेच नव्हे तर आयपीएस अधिकाऱ्यांनी त्यांचा राजीनामा मागे घेण्याची संधी देखील दिली जाते. ९० दिवसांच्या आत जर अधिकाऱ्यांनी जर अर्ज केला तर त्यांची सर्व्हीस पुन्हा बहाल केली जाते. यासाठी अधिकाऱ्यांचे जुने रेकॉर्ड्स पाहिले जातात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us