AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानच्या अंतराळवीराला घरच्या अन्नाची चव, खास हलाल मेन्यू, बटर चिकन, निहारी आणि कोरमा

पाकच्या अंतराळवीराला आवश्यक पोषण मिळावे आणि खास घरच्या पदार्थांची मूळ चव टिकून राहावी, यासाठी चीनी संशोधकांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

पाकिस्तानच्या अंतराळवीराला घरच्या अन्नाची चव, खास हलाल मेन्यू, बटर चिकन, निहारी आणि कोरमा
Pakistan astronaut
| Updated on: Nov 27, 2026 | 8:56 PM
Share

पाकिस्तानचा पहिला अंतराळवीर मुहम्मद झीशान अली याच्यासाठी चीनच्या तियांगोंग अंतराळ स्थानकात पाकिस्तानी खाद्यपदार्थांची तजवीज केली आहे. अंतराळवीरांसाठीचे अन्न खास प्रक्रिया करुन तयार केले जात असते. पाकिस्तानी अंतराळवीर मुहम्मद झीशान अली याच्या मेन्यूत बीफ निहारी, लँब कोरमा, बटर चिकन आणि छोले अशा पदार्थांचा समावेश केला गेला आहे. अंतराळातही त्याला पाकिस्तानी पदार्थांची चव चाखता येणार आहे. मुहम्मद झीशान अली हा चीनच्या अंतराळ स्थानकात जीवशास्त्र, क्विनोआच्या बिया आणि प्रगत सामग्रीशी संबंधित वैज्ञानिक प्रयोग करणार आहे.

अंतराळातही घरच्या जेवणाची चव!

अंतराळ स्थानकावरील जीवन पृथ्वीवरील जीवनाहून अनेक बाबतीत वेगळे आणि आव्हानात्मक असते. मात्र, पाकिस्तानचे पहिले अंतराळवीर मुहम्मद झीशान अली हे पृथ्वीपासून शेकडो किलोमीटर दूर असतानाही त्यांना घरच्या जेवणाची चव अनुभवण्याची खास व्यवस्था करण्यात आली आहे.

बटर चिकन, बीफ निहारी, लँब कोरमा आणि छोले यांसारखे खास पाकिस्तानी खाद्यपदार्थ त्यांच्या अंतराळ प्रवासासाठी विशेष तयार करण्यात आले आहेत.अली यांच्या आहारविषयक आवडी आणि हलाल अन्नाच्या नियमांचे पालन व्हावे, यासाठी या पदार्थांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे अंतराळातील पहिल्या मोहिमेतही त्यांना परिचित खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.

बटर चिकन, निहारी आणि कोरमा… अंतराळातील मेन्यूमध्ये काय?

अंतराळातील वातावरणात नेहमीच्या पद्धतीने जेवण तयार करणे शक्य नसते.त्यामुळे अली यांच्यासाठी खास खाद्यपदार्थ तयार करण्याची जबाबदारी चीनच्या अंतराळवीर संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने घेतली आहे. चीनच्या तज्ज्ञांनी दक्षिण आशियाई खाद्यसंस्कृतीतून प्रेरणा घेतलेले पाकिस्तानी पद्धतीचे ७ वेगवेगळे पदार्थ अंतराळातील खाद्यपदार्थात विकसित करण्यात आले आहेत.

या मेन्यूमध्ये प्रामुख्याने पुढील पदार्थांचा समावेश आहे.

– बीफ निहारी: मसालेदार आणि पारंपरिक पाकिस्तानी मांसाहारी पदार्थ.

– लँब कोरमा: मसाल्यांमध्ये शिजवलेला मटणाचा खास प्रकार.

– बटर चिकन: क्रीमी ग्रेव्हीमधील लोकप्रिय चिकन पदार्थ.

– मसालेदार छोले: चण्यांपासून तयार केलेला पदार्थ.

अंतराळवीरांना आवश्यक पोषण मिळण्याबरोबरच या खाद्य पदार्थांची मूळ चव टिकून राहावी, यासाठी संशोधकांनी विशेष प्रयत्न केले आहेत. अली यांना हळद आणि करीसारखे मसाले आवडत असल्याने त्यांच्याही आवडीचा विचार करण्यात आला आहे. अंतिम मेन्यू ठरवण्याआधी पाककृतींच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

Follow Us
पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर....
Rohit Sharma : पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर! रोहित शर्माला दिली कर्णधारपदाची जबाबदारी; आता मैदानात पुन्हा हिटमॅनराज चालणार
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा....
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण!
अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar : अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29....
Gold And Silver Rates Hike : जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29 लाखांवर, तर चांदी एवढ्या लाखांपार
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?