70 वर्षांच्या बड्या नेत्याचं 20 वर्षांच्या विद्यार्थिनीशी लग्न; 50 कोटींची प्रॉपर्टीसुद्धा केली नावावर

70 वर्षीय बड्या नेत्याची 20 वर्षांची चौथी बायको, विद्यार्थिीनीशीच उरकलं लग्न, 50 कोटींची प्रॉपर्टी देखील तिच्या नावावर, बायका आणि मुलांबद्दल जाणून व्हाल हैराण

70 वर्षांच्या बड्या नेत्याचं 20 वर्षांच्या विद्यार्थिनीशी लग्न; 50 कोटींची प्रॉपर्टीसुद्धा केली नावावर
| Updated on: May 07, 2026 | 1:26 PM

गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांचा राजकीय प्रवास नाही तर, त्यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. आता तर एका 70 वर्षीय बड्या नेत्याने 20 वर्षीय विद्यार्थिनीशी लग्न केलं आहे. शिवाय तिच्यावर नावावर प्रॉपर्टी देखील केली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद कोतवाली भागातील कैला भट्टा येथील सुमारे 50 कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून एका माजी नगरसेवकाच्या दुसऱ्या पत्नीने पतीवर गंभीर आरोप केले आहेत. दुसरी पत्नी नाझरीन हिने केलेल्या आरोपानुसार, पती हाजी खलील हे 70 वर्षांचे आहे. दोन वर्षांपूर्वी एका शाळेचे मॅनेजर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली, त्याच शाळेतील 20 वर्षीय विद्यार्थिनीशी नेत्याने लग्न केलं आहे. शिवाय प्रॉपर्टीमधील अधिक भाग देखील तिच्या नावावर केला आहे… तर दुसरी पत्नी नाझरीन आणि तिच्या तीन मुलांना घरातून बाहेर हाकललं आहे. सध्या पोलीस या प्रकरणी कसून चौकशी करत आहेत. तर प्रकरण संपत्ती संबंधी असल्याची माहिती समोर आली आहे.

गुन्हे विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, जयकरण नय्यर यांनी सांगितल्यानुसार, कैला भट्टा येथील रहिवासी नझरीन यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे पती हाजी खलील हे 1995 आणि 2000 मध्ये समाजवादी पक्षाच्या तिकिटावर इस्लामनगरमधून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. पहिल्यांदा नगरसेवक झाल्यानंतर, त्यांनी 1998 मध्ये पहिल्यांदा लग्न केलं. त्यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून आठ मुलं आहेत. त्यानंतर त्यांनी पहिला पत्नीला सोडलं आणि दुसरं लग्न नाझरिन यांच्यासोबत केलं.

नाझरिन यांनी तीन मुलं आहेत. त्यानंतर खलील यांनी तिसरं लग्न केलं. तिसऱ्या लग्नापासून त्यांना मुल नाही. तर वयाच्या 70 व्या वर्ष खलील यांनी 20 वर्षीय विद्यार्थिनीसोबत चौथं लग्न केलं. शिवाय तिच्या नावावर संपत्तीचा मोठा हिस्सा देखील केला आहे. तर दुसरी पत्नी आणि तिच्या तीन मुलांना घरातून हाकललं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी, नाझरीन, तिच्या दोन मुली आणि तिचा मुलगा यांच्यासोबत कैला भट्टा येथील दुकानात आले. हाजी खलील यांनी हे दुकान काही वर्षांपूर्वी रशीद नावाच्या एका तरुणाला विकले होते. विक्रीपत्रही रशीदकडेच आहे. पण नाझरिन यांनी बळबजरी दुकानाला टाळा लावला. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर नाझरिन हिला पोलीस स्थानकात बोलावलं. अशात रशीद याने पोलिसांना सर्व कायदेशीर कागदपत्र दाखवल्यानंतर पोलिसांनी नाझरिन हिला दुकानाचा टाळा खोलायला लावला.

पोलिसांची प्रतिक्रिया…

माजी नगरसेवकाच्या कुटुंबीयांनी दुकान ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. तपासात असं उघड झालं आहे की, दुकानदार आणि पोलिसांनाही उद्धटपणे वागणूक देण्यात आली. पीडित दुकानदाराने नाझरीन आणि तिच्या मुला-मुलींविरुद्ध मारहाण आणि दुकानावर अतिक्रमण केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू असल्याची माहिती डीसीपी शहर धवल जयस्वाल यांनी दिली आहे.

सपा जिल्हाध्यक्ष फैजल हुसैन यांनी दिलेल्या माहितीनुर, पूर्वी हाजी खलील पार्टीत असतील. पण आता त्यांचा पक्षाशी कोणतेच संबंध नाही. पोलीस आता याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

Follow Us