एकदम डेंजर! गायीच्या तोंडात फटका फुटला आणि…

| Updated on: Oct 28, 2022 | 9:53 PM

या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

एकदम डेंजर! गायीच्या तोंडात फटका फुटला आणि...
Cow Playing Football
Image Credit source: Social Media
Follow us on

कानपूर : दिवाळीला फटाके फोडताना सावधानी बाळगावी अशी सूचना केली जाते. तसेच फटाके सुरक्षित ठिकाणी ठेवावेत असा सूचनाही केल्या जातात. मात्र, काहीजण याकडे दुर्लक्ष करतात. मनुष्याची ही घाणेरडी सवय मुक्या प्राण्यांच्या जीवावर बेतत आहे. गायीच्या तोंडात फटका फुटल्याची भयानक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. या घटनेत गाय गंभीररीत्या जखमी झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. तसेच याचा तपास करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी देखील केली जात आहे.

दिवाळीत न वापरलेले किंवा न फुटलेले फटाके अनेकजण कचऱ्यात फेकून देतात. या कचऱ्यात फेकलेल्या फटाक्यांमुळे गाईच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये ही घटना घडली आहे.

उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे गायीच्या तोंडात फटाका फुटल्याने गाय गंभीर जखमी झाली आहे. या घटनेचा व्हीडिओ देखील व्हायरल झाला आहे.

गाईच्या तोंडात फटका फुटल्याने तिच्या जबड्याला जबर दुखापत झाली. कानपूरच्या काकादेव येथील नवीन नगर परिसरात ही भीषण घटना घडली आहे.

कचराकुंडीत फटाके फेकण्यात आले होते. या कचराकुंडीजवळ फिरणाऱ्या एका गायीने नकळत फटाळा तोंडाने उचलला. यानंतर गायीच्या तोंडातच हा फटाका फुटला.

हा फटाका फुटल्यानंतर गायीच्या जबड्याच्या चिंधड्या उडाल्या. ही गाय अत्यंत गंभीररीत्या जखमी झाली. जखमी अवस्थेत या गायीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी या घटनेचा तपास केला. तपासादरम्यान या घटनेपूर्वीचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गाय कचराकुंडीजवळ उभी दिसत आहे. गाय कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून काहीतरी वेचून खात होती.

त्यावेळी तो फटाका गाईच्या तोंडात गेला आणि फुटला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले.

जर कुणी खोडी काढण्यासाठी हा प्रकार केला असेल तर त्याच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, अशी तंबी पोलिसांनी दिली आहे. जखमी गायीवर डॉक्टर उपचार करत आहेत.

लवकरच या गाईवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तिच्या जबड्याचा बहुतांश भाग हा उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे सध्या तिला तात्पुरत्या स्वरूपात प्लास्टर लावून औषधोपचार करण्यात येत आहेत.