ISRO कडून एआय आणि मशिन लर्निंग शिकण्याची नामी संधी, तारीख लक्षात ठेवा….

भारतीय अंतराळ संशोधन संघटनेच्या ( इस्रो ) (आयआयआरएस) डेहराडून संस्थेच्या वतीने एआय आणि मशिन लर्गिंग फॉर हायड्रो-इन्फॉर्मेटिक्सचे ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले आहे.

ISRO कडून एआय आणि मशिन लर्निंग शिकण्याची नामी संधी, तारीख लक्षात ठेवा....
isro news
| Updated on: Sep 18, 2026 | 8:55 PM

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( इस्रो ) च्या संलग्न संस्था (आयआयआरएस) देहराडूनच्या वतीने एआय आणि मशिन लर्निंग फॉर हायड्रो-इन्फॉर्मेटिक्स’ या विषयावर मोफत ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजित केले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर आणि डिजिटल माध्यमातून प्रशिक्षण घेण्याची नामी संधी तरुणांना मिळणार आहे. या ऑनलाईन प्रशिक्षणाद्वारे हायड्रो-इन्फॉर्मेटिक्सशी संबंधित विषयात तंत्रज्ञानाचा वापर आणि जल संपत्तीशी संबंधित प्रयोगात एआय आणि मशिन लर्निंगचा उपयोग शिकवण्यात येणार आहे.

क्विजमध्ये भागीदारी गरजेची

प्रशिक्षणा दरम्यान भाग घेणाऱ्यांना इस्रो एलएमएसवर उपलब्ध दैनिक प्रश्नमंजूषेत सहभाग घेणे बंधनकारक आहे. एलएमएस प्रत्येक सहभागी पाठ्यक्रम घडोमोडींना ‘कोर्स डेडीकेशन’च्या रुपात ट्रॅक केले जाईल. यात व्हिडीओ लॉग्सवर घालवलेला वेळ, दैनिक प्रश्नमंजूषेतील भागीदार आणि अभ्यासक्रमाशी संबंधित अभिप्राय सबमिट करण्यासारख्या मानकांचा समावेश करण्यात आला आहे. अशाप्रकारे प्रशिक्षणातील सहभाग आणि त्यांची शिकण्याची क्रियाशीलता नोंदवली जाईल. त्यामुळे, संपूर्ण प्रशिक्षणादरम्यान सहभागींना त्यांचे एलएमएसवरील टास्क नियमितपणे पूर्ण करावे लागतील.

प्रमाण-पत्र मिळणार

टास्कला निर्धारितकत वेळेत पूर्ण करणाऱ्यांना उमेदवारांना ‘कोर्स पार्टिसिपेशन’ प्रमाण-पत्र प्रदान केले जाणार आहे. प्रमाणपत्र थेट इस्रोच्या ई-क्लास एलएमएसने डाऊन लोड केला जाऊ शकतो. सहभागींना प्रशिक्षण दरम्यान एलएमएसवर नियमित रुपाने आपला टास्क पूर्ण करावा लागणार आहे. म्हणजे त्यांना पाठ्यक्रमात भागीदारी नोंदवली होत राहिल. क्वीज आणि फिडबॅक सारखे टास्क देखील या प्रक्रियेचा एक भाग असतील.

हा प्रशिक्षण कार्यक्रम थेट आणि संवादात्मक सत्रांच्या स्वरूपात आयोजित केला जाईल

थेट सत्रांसोबत रेकॉर्ड केलेले व्हिडिओ देखील उपलब्ध असतील

भाग घेणाऱ्यांना ‘अभ्यासक्रम सहभाग’ प्रमाणपत्र मिळेल

उमेदवार इस्रोची अधिकृत वेबसाईट isrolms.irs.gov.in/edusatregistration वर जाऊन ४ ऑक्टोबर २०२६ मध्ये अर्ज करु शकतात. प्रशिक्षण ५ ते १० ऑक्टोबरपर्यंत हे प्रशिक्षण चालणार आहे. वैयक्तिक सहभागींना कोणत्याही वेगळ्या मंजुरीची आवश्यकता भासणार नाही आणि त्यांची नोंदणी आपोआप स्वीकारली जाईल. नोंदणी झाल्यावर त्यांना एलएमएस (LMS) लॉगिन माहिती उपलब्ध केली जाईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us