पृथ्वीवरचं स्वर्ग, येथे कोणीच काम करत नाही, सगळी जबाबदारी सरकारची, लोक फक्त घरात बसून राहतात

जगात अशी देखील एक जागा आहे, ज्याला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटलं जातं. जिथे लोकांना आपल्या उपजीविकेसाठी कोणतंही काम करण्याची गरजच नाहीये. या नागरिकांना सरकारकडून प्रचंड पैसा मिळतो. येथील नागरिकांची इच्छा असेल तरच ते नोकरी किंवा व्यवसाय करतात.

पृथ्वीवरचं स्वर्ग, येथे कोणीच काम करत नाही, सगळी जबाबदारी सरकारची, लोक फक्त घरात बसून राहतात
पृथ्वीवरच स्वर्ग
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 25, 2026 | 7:54 PM

जगात अशी देखील एक जागा आहे, ज्याला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटलं जातं. जिथे लोकांना आपल्या उपजीविकेसाठी कोणतंही काम करण्याची गरजच नाहीये. या नागरिकांना सरकारकडून प्रचंड पैसा मिळतो. येथील नागरिकांची इच्छा असेल तरच ते नोकरी किंवा व्यवसाय करतात. या लोकांना सरकारकडून एवढा पैसा मिळतो की, ते आयुष्यभर कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय न करता आरामात बसून खाऊ शकतील. तुम्हाला नवं घर बांधायचं असेल, नवी गाडी खरेदी करायची असेल तुमच्या मुलांचं शिक्षण करायचं असेल किंवा त्यांचं लग्न करायचं असेल, या सर्व गोष्टींची जबाबदारी येथील सरकारचं घेतं. येथील लोकांना गॅस, वीज आणि पाण्याचं बील काय असतं? ही गोष्टच या लोकांना माहिती नाही. या सर्व गोष्टी येथील सरकार त्यांना मोफत पुरवतं. एवढंच नाही तर येथील नागरिकांना वैद्यकीय सेवा देखील फ्रीमध्येच पुरावल्या जातात. हॉस्पिटलमध्ये एकही रुपया देण्याची गरज नसते.

आज आपण ज्या देशाबद्दल बोलत आहोत, तो देश दुसरा तिसरा कोणता नसून, तो देश आहे कतार. हो तुम्ही बरोबर ऐकलं आहे. कतारमध्ये तेथील सरकार आपल्या नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा फ्री मध्य पुरवतं, एवढंच नाही तर तेथील नागरिकांच्या मुलांच्या पालन पोषणाची तसेच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी देखील सरकारकडून घेतली जाते. तसेच हे सरकार आपल्या नागरिकांना खर्चासाठी देखील पैसे देतं. थोडक्यात काय तर येथील नागरिकांना कोणतंही काम करण्याची गरज नाहीये.

जसं एखादे आई-वडील आपल्या मुलांची काळजी घेतात, त्याचप्रमाणे येथील सरकार आपल्या नागरिकांची काळजी घेतं. गरिबी, बेरोजगारी असे शब्द येथील लोकांना माहितीच नाहीयेत. येथील लोकांना सर्व सुविधा मोफत पुरवल्या जातात. कतार हा असा एक देश आहे, जिथे पाण्याची किंमत ही पेट्रोल, डिझेलच्या दरापेक्षा देखील खूप जास्त महाग आहे, परंतु तरी देखील येथील सरकार नागरिकांना मोफत पाण्याचा पुरवठा करते, पाण्यासाठी येथील नागरिकांना एकही रुपया द्यावा लागत नाही. मुलांना जन्माला घालणं एवढंच आई-वडीलाचं काम आहे, त्यानंतर बाकीची सर्व जबाबदारी येथील सरकारच घेतं. मुलांच्या पालन-पोषणापासून ते त्याच्या लग्नपर्यंतचा खर्च येथील सरकारचं करतं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us