रात्री आई-वडिलांना जेवणातून द्यायची गुंगीचं औषध, नंतर प्रियकरासोबत… मुलीचं भयंकर कांड समोर येताच..

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात एक नऊ वर्षांची मुलगी रोज आई-वडिलांना जेवणातून गुंगीचे औषध द्यायची. एक दिवस तिच्या वडिलांना याबाबत कळाले. नंतर जे घडलं त्याने अनेकांना धक्काच बसला आहे.

रात्री आई-वडिलांना जेवणातून द्यायची गुंगीचं औषध, नंतर प्रियकरासोबत... मुलीचं भयंकर कांड समोर येताच..
सांकेतिक फोटो
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jan 12, 2026 | 5:10 PM

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे आहे. १५ वर्षीय 9वीच्या विद्यार्थिनीने आपल्या आई-वडील आणि आजीला झोपवण्यासाठी त्यांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. जेणेकरून त्यांना गुंगी चढल्यावर ते गाढ झोपी जातील. ते झोपल्यानंतर ती खात्री करुन आपल्या 22 वर्षीय प्रियकराला भेटायला जायची. पण जेव्हा तिच्या वडिलांना याबाबत कळाले तेव्हा त्यांनी मोठे पाऊल उचलले. पोलिसांच्या मते, त्या मुलाने मुलीचे ब्रेनवॉश केले होते आणि ती त्याच्या सूचनांचे पालन करत होती. आता नेमकं प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया…

नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील गोरखपुरमधील गुलरिहा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका गावात ही मुलगी आपल्या आई आणि वृद्ध आजीसोबत राहत होती. तिचे वडील मुंबईत पेंटरचे काम करतात. एक महिना आधी घरी परतलेल्या वडिलांना मुलीच्या वर्तनात बदल दिसला. ती सतत फोनवर बोलत असे आणि तासन्तास बाहेर राहत असे. यामुळे वडील तिला खूप ओरडले. रात्रीच्या जेवणानंतर वडिलांना असामान्य झोप येऊ लागली. पत्नी आणि आईनेही असेच सांगितले. मुलगी जेवण वाढताना काही तरी त्यामध्ये मिसळत असल्याची वडिलांना शंका आली. 3 जानेवारीला त्यांनी एक योजना आखली. मुलीने जेवण वाढल्यानंतर त्यांनी आणि पत्नीने ते जेवण गुपूच लपवले. तसेच मुलीसमोर ते खाल्ले असल्याचे दाखवले.

त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी झोपेचे सोंग घेतले. रात्री ११:३० वाजता त्यांना काही आवाज ऐकू आले. ते चुपचाप बाहेर गेले आणि पाहिले की मुलगी शाल ओढून कुठेतरी जात आहे. ते तिच्या मागे गेले. २०० मीटर अंतरावर ती शेजारच्या मुलाच्या घरी गेली. तो मुलगा तिला आत घेऊन गेला. पालकांनी मुलीला त्या मुलासोबत एका खोलीत रंगेहाथ पकडले. नंतर मुलीने कबूली दिली की, ती एक वर्षापेक्षा जास्त काळापासून शेजारच्या मुलाच्या संपर्कात आहे. त्यानेच जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळण्याचा आयडिया दिली आणि गोळ्या पुरवल्या. तिने चुपचाप त्या मिसळल्या.

पुढे काय झाले?

४ जानेवारीला गावात पंचायत झाली. मुलाने माफी मागितली आणि पुन्हा असा प्रकार होणार नाही असे वचन दिले. पण वर्तनात सुधारणा झाला नाही. कुटुंबाने त्याच्या घरी जाऊन तक्रार केली असता, त्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि पळून गेला. त्यानंतर वडिलांनी गुलरिहा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.