भारतातील असं एक गाव जिथे सर्वच आहेत घर जावई, लग्नानंतर मुलगा सोडतो आपलं घर

या गावात कोणत्याही मुलीचं लग्न झालं तर ती मुलगी आपल्या पतीच्या घरी जात नाही, तर पतीच पत्नीच्या घरी येतो. याच अटीवर या गावातील मुलींची लग्न होतात, अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे.

भारतातील असं एक गाव जिथे सर्वच आहेत घर जावई, लग्नानंतर मुलगा सोडतो आपलं घर
| Updated on: Aug 07, 2025 | 1:24 PM

आपला भारत देश हा विविधतेमध्ये एकता असलेला देश आहे, भारतामध्ये हजारो प्रकारच्या भाषा बोलल्या जातात, विविध जाती धर्माचे लोक राहतात, प्रत्येकाच्या वेषभूषा, प्रथा, पंरपरा देखील वेगवेगळ्या आहेत, आपल्या देशामध्ये अशा काही परंपरा आहेत, ज्या परंपरांबद्दल आपण कधीही यापूर्वी ऐकलं नसेल, अशाच एका प्रथेबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. या गावामध्ये शेकडो वर्षांपासून अशी एक प्रथा पाळली जाते, ज्याबद्दल ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. चला तर मग काय आहे ही प्रथा आणि कोणतं आहे ते गाव? याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

देशात 2014 साली भाजपाचं सरकार आलं, सरकारकडून सध्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओची’ घोषणा देण्यात आली आहे, मुलींच्या शिक्षणासाठी जोरदार प्रयत्न सुरू असून, मुलींना सरकारकडून शिक्षणासाठी प्रोहत्साहन देण्यात येत आहेत. मात्र उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यात एक असं गाव आहे, जिथे लग्न झाल्यानंतर मुलगी आपल्या पतीच्या घरी जात नाही, तर पतीच आपल्या पत्नीच्या घरी म्हणजे सासरी कायमचा राहण्यासाठी येतो. करारी असं या गावाचं नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या गावात ही प्रथा पाळली जाते. पूर्वीच्या काळात सासरच्या मंडळींकडून महिलांवर खूप अत्याचार व्हायचे, त्यांचा छळ व्हायचा, त्यामुळे आपल्या गावातील कोणतीही महिला या अत्याचाराचा बळी ठरू नये, या विचारातून ही प्रथा सुरू झाल्याची माहिती समोर येते.

मात्र तेव्हापासून ते आजपर्यंत गावात ही प्रथा सुरूच आहे, या गावात कोणत्याही मुलीचं लग्न झालं तर ती मुलगी आपल्या पतीच्या घरी जात नाही, तर पतीच पत्नीच्या घरी येतो.या गावाची एकच अट आहे ती म्हणजे या गावातील लोक आपल्या मुलीचं लग्न अशाच व्यक्तीसोबत करतात, जो घर जावई होण्यास तयार असतो. लग्न झाल्यानंतर या व्यक्तीला आपलं घरदार सोडून या गावात राहण्यासाठी यावं लागतं.

गावात 50 पेक्षा अधिक घर जावई

हे छोटसं गाव उत्तर प्रदेशातल्या कौशांबी जिल्ह्यात आहे, गावातील या प्रथेमुळे गावामध्ये ज्या कुटुंबात मुलीचं लग्न झालं आहे, अशा प्रत्येक ठिकाणी घर जावई पाहायला मिळतो, गावामध्ये जवळपास 50 ते 60 च्या आसपास घर जावई आहेत, अशा माहिती स्थानिकांनी दिली.