अभिजीत दीपकेंचा आज वाढदिवस, किती वर्षाचे झाले? खास व्यक्तीने दिल्या अशा शुभेच्छा…

कॉकरोच जनता पार्टी (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांचा आज 31 वा वाढदिवस आहे. देशविदेशातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आशुतोष रांकांसारख्या सहकाऱ्यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिजीत दीपकेंचा आज वाढदिवस, किती वर्षाचे झाले? खास व्यक्तीने दिल्या अशा शुभेच्छा...
Abhijeet Dipke
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 29, 2026 | 12:50 PM

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आज देश विदेशातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सकाळपासूनच त्यांना फोन, मेसेजवरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरही शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. यंग लीडर म्हणून त्यांची स्तुती केली जात आहे. अभिजीत दीपके यांचे खास सहकारी आणि सीजेपीचे सहसंयोजक, तसेच प्रवक्ते आशुतोष रांका यांनीही खास पोस्ट लिहून अभिजीत दीपके यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. रांका यांनी दीपके यांच्यासोबतचे असंख्य फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.

आशुतोष रांका यांनी अभिजीत दीपके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा अभिजीत दीपके. जेव्हा आमची आशा संपत चालली होती, तेव्हा तू या देशाला (आणि मलाही) सावरलेस आणि पुढे नेलेस. आपल्या वाट्याला येणाऱ्या त्या सर्व अद्भुत गोष्टींसाठी आणि सुंदर क्षणांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!, असं रांका यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Loading...

 

किती वर्षाचे झाले दीपके?

अभिजीत दीपके यांचा जन्म छत्रपती संभाजीनगरचा. 29 सप्टेंबर 1995 रोजी दीपकेंचा जन्म झाला. आज ते 31 वर्षाचे झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांवर टिप्पणी केल्यानंतर 16 मे 2026 रोजी अभिजीत दीपके यांनी कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली. गंमत म्हणून त्यांनी पक्ष स्थापन केला. सोशल मीडियावर त्याची माहिती दिली आहे आणि त्यांना अवघ्या काही तासात लाखो फॉलोवर्स मिळाले.

त्यानंतर नीट पेपरफुटी प्रकरणाचा मुद्दा हाती घेऊन त्यांनी तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यासाठी त्यांनी सोनम वांगचुक यांच्यासोबत दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन छेडलं. वांगचुक यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. त्यांचं उपोषण जबरदस्ती सोडवण्यात आलं. त्यांचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे 20 जुलै रोजी संसदेवर मार्च काढण्याचा निर्णय सीजेपीने घेतला. मात्र, या मोर्चावर अमानूष लाठीमार करण्यात आला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या. विद्यार्थ्यांवर भयानक हल्ला झाला. देशभरात संतापाची लाट पसरली.

देशातील अनेक भागात आंदोलन सुरू झालं. सरकारच्या विरोधात अख्खा देश एकवटला. त्यामुळे 25 जुलै रोजी अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याने सीजेपीने आंदोलन संपवण्याची घोषणा केली. त्यानंतर अभिजीत दीपके यांचं राजकीय क्षेत्रात वजन वाढत गेलं.

कोण आहेत अभिजीत दीपके?

अभिजीत दीपके हे मूळचे छत्रपती संभाजीनगरचे आहेत. शिक्षणासाठी ते दोन वर्ष अमेरिकेत होते. त्यांनी पुण्यातून पदवी घेतली आहे. यापूर्वी ते तीन वर्ष आम आदमी पार्टीशी संबंधित होते. स्वत: दीपके यांनी त्याची कबूली दिली असून त्यात काही गैर नसल्याचं म्हटलं आहे. मी काही काळ आम आदमी पार्टीत काम केलं. त्यानंतर मला उच्च शिक्षण घेण्याची गरज भासू लागली. मी घरीच मास्टर्स डिग्री घेण्याची तयारी करू लागलो. त्यानंतर बोस्टन विद्यापीठाने मला बोलावलं. आणि मी तिथे गेलो, असं दीपकेंनी यापूर्वीच स्पष्ट केलंय. दीपकेंनी बोस्टन विद्यापीठातून पब्लिक रिलेशन्समध्ये मास्टर्स डिग्री घेतली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us