AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke : ‘बेधडक सांगतो…’; अभिजीत दीपकेंचं ‘आप’बद्दल मोठं विधान, काय काय सांगितलं?

अभिजीत दीपके यांनी आपण 'आप'सोबत काम केल्याची कबुली दिली आहे. 'मी आम आदमी पार्टीमध्ये प्रसिद्धीचे काम केले आणि मला त्याचा अभिमान आहे,' असे त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले. विरोधक त्यांच्या या भूतकाळाचा वापर करत असले तरी, शिक्षण व आरोग्यावर काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांना समाधान आहे. यामुळे दीपके यांच्या 'आप'संबंधी चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Abhijeet Dipke : ‘बेधडक सांगतो...’; अभिजीत दीपकेंचं ‘आप’बद्दल मोठं विधान, काय काय सांगितलं?
Abhijit DipkeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 02, 2026 | 10:51 AM
Share

अभिजीत दीपके खरोखरच अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीत काम करायचे की नाही? याची वारंवार चर्चा होत असते. आता या मुद्द्यावर पुन्हा एकदा अभिजीत दीपके यांनी थेट विधान केलं आहे. एका मुलाखतीत अभिजीत दीपके यांनी आपण आम आदमी पार्टीसोबत काम करत होतो आणि मला त्याचा अभिमान आहे, असं म्हटलं आहे. त्यामुळे दीपके यांच्या बाबतच्या उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

अभिजीत दीपके यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत आपबाबतच्या संबंधावर प्रकाश टाकला आहे. तुम्ही आधी एका विरोधी पक्षाशी संबंधित होता. त्याचा वापर नेहमी तुमच्या विरोधात केला जाईल का? असा सवाल दीपके यांना विचारण्यात आला. त्यावर दीपके यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. मला वाटतं ही एक इको सिस्टिम असेल. पुन्हा तुम्हाला त्याच त्याच ठिकाणी नेलं जाईल. तुम्ही आम आदमी पार्टीशी संबंधित होता हे वारंवार सांगितलं जाईल. आम आदमी पार्टी एक राजकीय पक्ष आहे. मी त्या पक्षात काम केलं आहे. मी तिथे प्रसिद्धीचं काम करत होतो. मी हे कुठेच लपवलेलं नाही. मी त्यावर बिनधास्तपणे बोललो आहे. मी आपमध्ये काम केल्याबद्दल मला अभिमानच आहे, असं दीपके म्हणाले.

तर त्यांनी खुशाल वापर करावा

मला शिक्षण आणि आरोग्यावर काम करण्याची संधी मिळाली. आता या गोष्टीचा वापर विरोधक माझ्यावर निशाणा साधण्यासाठी करत असतील तर त्यांनी खुशाल करावा. याचा अर्थ असा की मला टार्गेट करण्यासाठी त्यांना भूतकाळात गेल्याशिवाय पर्याय नाहीये, असं दीपके म्हणाले. बीबीसीमध्ये मे महिन्यात प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या बोस्टनला जाण्यापूर्वी दीपके हे आम आदमी पार्टीसोबत काम करत होते. त्यानंतर दीपकेंवर सातत्याने आप सोबत असल्याचा आरोप केला जात होता.

5 सप्टेंबरला आंदोलन नाही

दरम्यान, केंद्र सरकारकडून आश्वासनांची पूर्तता होत नसल्याच्या निषेधार्थ सीजेपीने दिल्लीच्या इंडिया गेटवर येत्या 5 सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. जंतरमंतरवरील आंदोलनातील आंदोलकांवरील एफआयआर मागे घेण्यासाठी या आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, काल सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थी आंदोलनातील देशभरातील एफआयआर रद्द करण्याचा निर्णय घेतला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कायद्याने दिलेल्या विशेष शक्तीचा वापर करत हा निर्णय दिला. त्यामुळे सीजेपीने कोर्टाचे आभार मानत 5 सप्टेंबरचं आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,