आशुतोष रांका आणि साैरभ दास यांची जेलमध्ये रवानगी होताच अभिजीत दिपके यांची पहिली प्रतिक्रिया, थेट इशारा देत..

सीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्ली पोलिसांनी काल अटक केली. आज त्यांची तुरूंगात रवानगी करण्यात आली. अभिजीत दिपके दिल्लीकडे रवाना झाले. त्यातच अनेक मोठ्या अपडेट येत आहेत. अभिजीत दिपके यांनी साैरभ आणि आशुतोष रांका यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली.

आशुतोष रांका आणि साैरभ दास यांची जेलमध्ये रवानगी होताच अभिजीत दिपके यांची पहिली प्रतिक्रिया, थेट इशारा देत..
Abhijit Dipke Ashutosh Ranka Saurabh Das
| Updated on: Oct 14, 2026 | 9:53 AM

कॉकरोच जनता पार्टीला मोठा दणका बसला आहे. अभिजीत दिपके दिल्लीत नसताना त्यांच्या महत्वाच्या दोन नेत्यांना पोलिसांनी अटक करत तुरूंगात रवानगी केली. आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांना दिली पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर त्यांना हजर करण्यात आले. दिल्लीतील मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर त्यांना हजर केल्यानंतर त्यांना थेट तुरूंगात पाठवण्यात आले. जंतरमंतरवर आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसानी तिघांना रात्री उशीरा अटक केली होती. जंतरमंतरच्या प्रतिबंधित ठिकाणी बेकायदेशीर प्रवेश करणे आणि शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दोन महत्वाच्या नेत्यांची तुरूंगात रवानगी झाल्यानंतर अभिजीत दिपके यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. अभिजीत दिपके यांनी म्हटले की, पुढे येऊन करा ना…जे करायचे आहे ते… जंतरमंतरवर तिरंगा फडकवण्यासाठी तुम्ही पाच दिवस तुरूंगात टाकत आहात.

तिरंगा फडकावणे या देशात कधीपासून पाप झाले? मी नरेंद्र मोदी यांना सांगू इच्छतो की, इतके घाबरू नका. काय करायचे ते ऑफिसली करा.. आपत्कालीन परिस्थिती लावायची तर लावा ना.. सरकारने तुरूंगात टाकले तरीही आम्ही घारबरत नाहीत. सत्तेत असलेले सर्व लोक भितरे आहेत. ते पोलिसांच्या मागे लपत आहेत. काल साैरभ, आशुतोष आणि अजिंक्य यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना त्यांच्या वकिलांसोबतही मिळू दिले गेले नाही.

Loading...

आज सकाळी साैरभ आणि आशुतोष यांना पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. काय पाठवण्यात आले त्यांना? त्यांचा गुन्हा काय होता? त्यांचा गुन्हा फक्त हाच होता की, ते जंतरमंतरवर गेले आणि तिथे त्यांनी तिंरगा फडकावला. नरेंद्र मोदी यांच्या राजमध्ये जंतरमंतरवर तिरंगा फडकावणे पाप झाले आहे? मला सुरक्षेची काही गरत नाही, म्हणून मी नागपूर पोलिसांनी दिलेली सुरक्षा नाकारली आहे.

आम्ही तुरूंगात पाठवल्याने घारबरत नाही. आमची एकच मागणी आहे ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा, ज्ञानेश कुमार सत्तेत राहण्यासाठी मोदींची मदत करत आहे. कॉकरोच जनता पार्टी ही स्वातंत्र पार्टी आहे. आम्ही आमचे आंदोलन करू. पण याचा हा अर्थ नाही की,आम्ही इंडिया आघाडीविरोधात आहोत.इंडिया आघाडीचे आंदोलन आणि आमचे आंदोलन एकाच मागणीसाठी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us