मोठी बातमी! अभिजीत दिपके दिल्लीत पोहोचण्यापूर्वीच महत्वाच्या दोन नेत्यांची थेट तुरुंगात रवानगी, सकाळीच..
सीजेपीला मोठा दणका बसला आहे. अभिजीत दिपके दिल्लीत नसताना त्यांच्या दोन महत्वाच्या नेत्यांना पोलिसांनी अटक करत तुरूंगात रवानगी केली. याबाबत मोठी अपडेट पुढे येत आहे. आज अभिजीत दिपके दिल्लीमध्ये दुपारपर्यंत दाखल होतील.

आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांना दिली पोलिसांकडून अटक करण्यात आली. मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर त्यांना हजर करण्यात आले. दिल्लीतील मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर त्यांना हजर करण्यात आले. काल जंतरमंतरवर आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसानी तिघांना रात्री उशीरा अटक केली होती. जंतरमंतरच्या प्रतिबंधित ठिकाणी बेकायदेशीर प्रवेश करणे, कार्यकारी दंडाधिकारी यांनी घातलेल्या अटी शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांनाही अटक करण्यात आली. सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दुसऱ्यांदा अटक करण्यात आली. दिल्लीत दाखल होताच त्यांना पोलिसांनी अटक केली होती. काही नियम आणि अटी ठेऊन त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, त्यांनी पुन्हा जंतरमंतरवर जाण्याचा प्रयत्न केला.
त्यातच सीपेजीच्या दोन नेत्यांची रवानगी आता थेट तुरुंगात झाली. आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पाच दिवस तुरुंगावासात पाठवण्यात आले. काल त्यांना पोलिसांनी अगोदर ताब्यात घेतले होते. त्यानंतर रात्री उशीरा अटक करण्यात आली. आज सकाळी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर त्यांना हजर करण्यात आले. आता 5 दिवस तुरुंगात राहवे लागणार आहे.
रत्ना सिंग यांनी यापूर्वी एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली. त्यांनी म्हटले होते की, आज दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर प्रकरणाच्या संदर्भात सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांना पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात अटक केली. त्यांच्यावर अनधिकृत प्रवेश, बंधपत्रातील अटींचे उल्लंघन आणि सरकारी कर्मचाऱ्याच्या कर्तव्यपालनात अडथळा आणणे यांसारखे आरोप ठेवण्यात आले आहेत.
त्यांना न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात पाठवले जाण्याची शक्यता आहे. महत्वाचे दोन नेते तुरुंगात गेल्यानंतर अभिजीत दिपके नागपूरहून दिल्लीकडे रवाना होणार आहेत. दिल्ली विमानतळावर साधारण एकपर्यंत दिपके पोहोचलीत. त्यापूर्वी त्यांनी आशुतोष आणि साैरभ यांच्याकरिता सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. अभिजीत दिपकेंची भूमिका नक्की काय असणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
