ना साप ना विंचू, ना सिंह, वाघ; या छोट्याशा जीवामुळे जगात होतात सर्वाधिक मृत्यू, माणसांचा सर्वात मोठा शत्रू
तुम्ही जेव्हा खरतनाक प्राण्यांबद्दल विचार करता तेव्हा तुमच्या डोळ्यापुढे साप, विंचू, सिंह, वाघ या सारखे प्राणी येतात. परंतु पृथ्वीवर या सर्वांपेक्षा देखील एक खरतनाक जीव आहे. ज्यामुळे दरवर्षी सर्वाधिक मृत्यू होतात.

जेव्हा तुम्ही जगातील सर्वाधिक धोकादायक आणि ज्या प्राण्यामुळे सर्वाधिक मृ्त्यू होऊ शकतात अशा प्राण्याचा विचार करतात, तेव्हा तुमच्या डोळ्यापुढे साप, विंचू, वाघ, सिंह, शार्क असे काही खरतनाक प्राणी येतात. मात्र तुम्हाला हे ऐकूण आश्चर्याचा धक्का बसेल की जगात सर्वाधिक मृत्यू हे एका छोट्या जीवामुळे होतात. जगात जेवढे मृत्यू सर्पदंश, विंचू किंवा इतर प्राण्यांमुळे होत नाहीत, तेवढे मृत्यू पृथ्वीवरील या छोट्या जीवामुळे होतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच नेमका असा हा प्राणी आहे तरी कोणता? हा प्राणी दुसरा तिसरा कोणी नसून याचं नाव आहे डास, हो तुम्ही बरोबर ऐकलं आहे, जागतिक आरोग्य डेटामधून प्राप्त आकेडवारीनुसार जगात सर्वाधिक मृत्यू हे डासांमुळे होतात. डासांचा आकार हा खूप छोटा असतो, मात्र तरी देखील डासांना माणसांसाठी पृथ्वीवरचे सर्वाधिक खरतनाक जीव मानलं गेलं आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे डास हे अनेक आजारांचे वाहक असतात. यातील काही आजार हे जीवघेणे ठरू शकतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगात डासांमुळे दरवर्षी तब्बल सात लाख लोकांचा मृत्यू होतो. डास हे माणसांना चावतात म्हणूनच ते खरतनाक नाहीत तर ते अनेक आजारांचे वाहक देखील आहेत. जेव्हा एखाद्या आजाराचा संक्रमित डास हा एखाद्या व्यक्तीला चावतो, तेव्हा त्याच्या शरीरातून तो व्हायरस त्या व्यक्तीच्या शरीरात देखील प्रवेश करतो आणि त्या व्यक्तीला आजाराची लागण होते. डासांपासून मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, झिका व्हायरस अशा अनेक जीवघेण्या आजारांचा प्रसार हा मानवी शरीरात होतो, त्यामुळे डसांना पृथ्वीवरील सर्वात खरतनाक जीव मानलं गेलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार अविकसीत आणि विकसंशील देशामध्ये डासांपासून होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण अधिक आहे.
मलेरियामुळे सर्वाधिक मृत्यू
डासांपासून ज्या आजारांचा प्रसार होतो, त्यामध्ये मलेरिया हा सर्वात घातक आजार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगात मलेरियामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. जे लोक अशक्त असतात किंवा ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, असे लोक या आजाराला सहज बळी पडतात, अशी ही आकडेवारी सांगते. त्यामुळे डासांपासून जरा जपूनच.