Flag Hoisting : स्वातंत्र्यानंतर थेट अमृत महोत्सवीच फडकला तिरंगा, बंगळूरच्या ईदगाह मैदानावर ध्वजारोहण, काय आहे नेमके कारण?

| Updated on: Aug 15, 2022 | 7:39 PM

स्वातंत्र्यानंतर प्रथमच ध्वजारोहण होत असल्याने येथील ईदगाह मैदनावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ध्वजारोहण होताच राष्ट्रगीत पार पडले आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गायली एवढेच नाही तर सैन्यांचे योगदान सर्वांसमोर यावे या उद्देशाने लुघनाटकाचेही सादरीकरण झाले.

Flag Hoisting : स्वातंत्र्यानंतर थेट अमृत महोत्सवीच फडकला तिरंगा, बंगळूरच्या ईदगाह मैदानावर ध्वजारोहण, काय आहे नेमके कारण?
बंगळुरु येथील ईदगाह मैदनावर यावर्षी प्रथमच ध्वजारोहण झाले आहे
Follow us on

मुंबई : संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा (Amrit Mahotsav) अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला आहे. केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आली आहे. असे असले तरी एक ठिकाण असे आहे जिथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच तिरंगा फडकला आहे. वाटले ना आश्चर्य पण (Bangalore) बंगळुरुच्या ईदगाह मैदानावर पहिल्यांदा तिरंगा हा फडकला आहे. यंदाच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधून कडक सुरक्षा व्यवस्थेत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रथमच बेंगळुरूतील वादग्रस्त ईदगाह मैदानावर (Flag Hosting) झेंडा फडकवला आहे. क्फ बोर्ड आणि नागरी अधिकारी यांच्यात या जागेवरुन वाद आहे. त्यामुळे चामराजपेटमधील ईदगाह मैदान हे वादाच्या भोवऱ्यात असल्याने येथे कोणी झेंडा फडकवत नव्हते. यासंबंधी 3 ऑगस्ट रोजी ही मालमत्ता राज्याच्या महसूल विभागाची असल्याचे घोषित करण्यात आले होते. असे असतानाही सबंधितांकडून धमक्याचे फोन येत होते. असे असतानाही कडक सुरक्षतेमध्ये ध्वजारोहण करण्यात आले आहे.

महापालिकेचे काय आहे म्हणणे?

महापालिकेच्या म्हणण्यानुसार वक्फ बोर्डाला मालकी हक्क सांगण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता. सकाळी आठच्या सुमारास ईदगाह मैदानावर बेंगळुरूचे शहरी सहाय्यक आयुक्त डॉ. एम. जी. शिवन्ना, चामराजपेटचे आमदार जमीर अहमद खान, बेंगळुरू मध्य मतदारसंघातील लोकसभा सदस्य पी. सी. मोहन, अतिरिक्त पोलिस आयुक्त संदीप पाटील यांच्यासह तिरंगा फडकवला आहे. केवळ जागेतील वादामुळे हा येथे ध्वजारोहण होत नव्हते. अखेर तिढा सुटला असून आता दरवर्षी झेंडा फडकवला जाईल असा विश्वास आहे.

विविध कार्यक्रमाचे आयोजन

स्वातंत्र्यानंतर प्रथमच ध्वजारोहण होत असल्याने येथील ईदगाह मैदनावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ध्वजारोहण होताच राष्ट्रगीत पार पडले आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गायली एवढेच नाही तर सैन्यांचे योगदान सर्वांसमोर यावे या उद्देशाने लुघनाटकाचेही सादरीकरण झाले. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले. मात्र, हे सर्व होत असताना कडक सुरक्षा यंत्रणाही तैनात होती.

कार्यक्रमाचा शेवट मिठाई वाटपाने

15 ऑगस्ट हा राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात पार पडला आहे. देशभर या अमृत महोत्सवामुळे एक वेगळाच उत्साह असला तरी येथील ईदगाह मैदनातील वातावरण हे वगळेच होते. येथील मैदनावर 300 हून अधिक खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या शेवटी महसूल विभाग आणि ब्रुहाट बेंगळूर महानगर पालिका अधिकाऱ्यांनी जनतेला मिठाई वाटली. दरम्यान, शांतता राखण्यासाठी ईदगाह मैदानावर सांस्कृतिक संघटनांना तिरंगा फडकवण्याची किंवा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे आदेश महसूल विभागाने दिले होते. मात्र, सर्व कार्यक्रम शांततेने पार पडले आहेत.