Ajmer Sharif Dargah Temple Row : अजमेरच्या दर्ग्यात मंदिराचा दावा, कोण आहेत संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती?

Ajmer Sharif Dargah Temple Row : उत्तर प्रदेशच्या संभलमधील जामा मशिदीनंतर आता राजस्थानच्या अजमेरमधील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याची चर्चा आहे. जामा मशिदीनंतर आता या दर्ग्याच्या सर्वेचा आदेश दिला जाऊ शकतो. सध्या सुरु असलेल्या चर्चेच्या निमित्ताने हे ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती कोण होते? ते कुठून आलेले? हा सर्व इतिहास काय आहे? त्या बद्दल जाणून घेऊया.

Ajmer Sharif Dargah Temple Row : अजमेरच्या दर्ग्यात मंदिराचा दावा, कोण आहेत संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती?
Ajmer Sharif Dargah
| Updated on: Dec 02, 2024 | 11:28 AM

उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये जामा मशिदीच्या सर्वेवरुन मोठा वाद झाला. हिंसाचार झाला. काही जणांचा मृत्यू झाला. आता जामा मशिदीनंतर राजस्थानच्या अजमेर येथील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्गा चर्चेत आला आहे. जामा मशिदीनंतर आता अजमेर दर्ग्याच्या सर्वेचा आदेश दिला जाऊ शकतो. अजमेर शरीफ दर्गा बनण्याआधी तिथे हिंदू मंदिर होतं, असा दावा करण्यात आला आहे. तशी याचिका राजस्थानातील एका सत्र न्यायालयाने स्वीकारली आहे. हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी ही याचिका दाखल केली आहे. दर्ग्याच्या जागी आधी शिव मंदिर होतं, असा दावा त्यांनी केला आहे. अजमेरचा हा दर्गा सगळ्या भारतात प्रसिद्ध आहे. अनेक नामवंत राजकीय नेते, सेलिब्रिटी या दर्ग्याला भेट देऊन ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचं दर्शन घेतात. हे ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती कोण होते? ते कुठून आलेले? हा सर्व इतिहास काय आहे? त्या बद्दल जाणून घेऊया. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती हे पर्शिया आताच्या इराणमधून भारतात आले. ख्वाजा...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा